आता कुठूनही करता येईल मतदान! १६ जानेवारीला ‘रिमोट ईव्हीएम’ प्रकल्पाचे प्रात्यक्षिक

166

अनेक लोक नोकरी किंवा व्यवसायानिमित्त आपले गृहराज्य सोडून स्थलांतरण करतात. स्थलांतरण केलेल्या नागरिकांना आता मतदानासाठी आपल्या मूळ राज्यात येण्याची गरज नाही. स्थलांतरित मतदारांचे वास्तव्य असलेल्या ठिकाणाहून मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्याची प्रणाली केंद्रीय निवडणूक आयोगाने विकसित केली आहे.

( हेही वाचा : नवीन वर्षाचे स्वागत बेस्टच्या खुल्या दुमजली बसमधून… )

रिमोट ईव्हीएम प्रकल्पाची व्याख्या निश्चित करणे आवश्यक 

स्थलांतरामुळे अनेक नागरिकांना मतदानाच्या हक्कापासून वंचित रहावे लागते परंतु येथून पुढे ही समस्या सुटणार आहे. कारण विज्ञान युगात तंत्रज्ञानाचा योग्या वापर करण्याची आवश्यकता आहे असे निवडणूक आयोगाने रिमोट ईव्हीएम या प्रकल्पाची संकल्पना मांडताना म्हटले आहे. लग्न, शिक्षण, व्यवसाय इत्यादी अनेक कारणांमुळे जवळपास ८५ टक्के मतदार हे इतर राज्यांमध्ये स्थलांतरिक होत आहेत. रिमोट ईव्हीएम हा प्रकल्प राबवताना निवडणूक आयोगासमोर अनेक आव्हाने असणार आहेत. तसेच याचा लाभ नेमके कोणते मतदार घेऊ शकतात याची व्याख्या निश्चित करावी लागणार आहे.

१६ जानेवारीला होणार प्रात्यक्षिक

या प्रायोगिक प्रकल्पाचे प्रात्यक्षिक पाहण्यासाठी निवडणूक आयोगाने सर्व राजकीय पक्षांना पाचारण केले आहे. रिमोट ईव्हीएम या प्रकल्पाच्या माध्यामातून ७२ मतदारसंघांसाठी मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात येईल असा दावाही निवडणूक आयोगाने केला आहे. १६ जानेवारीला या प्रकल्पाविषयी विस्तृत माहिती मिळून रिमोट ईव्हीएमद्वारे कसे मतदान करता येईल हे स्पष्ट करण्यात येणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.