पुण्याला जिजाऊंचा इतिहास आहे. राष्ट्रमाता जिजाऊंनी बेचिराख झालेल्या ‘पुणे’ला वसवले. त्या पुण्याला जिजाऊंचे नाव देऊन पुण्याचे ‘जिजापूर’ असे नामांतर करावे, अशी विनंती संभाजी ब्रिगेडने राज्य सरकारला केली आहे.
औंरगाबादचे नामांतर संभाजीनगर करण्यास वेळ लागत असेल तर पुण्याला राष्ट्रमाता जिजाऊंचे नाव देऊन या शहराचे नामांतर जिजापूर असे करा, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी केली आहे. जिजाऊंनी बेचिराख झालेले पुणे शहर वसवले. पुण्याला जिजाऊंचा इतिहास आहे. पुणे शहर हे माॅंसाहेब जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचे प्रतीक आहे. त्यामुळे नामांतराचे राजकारण करु नका. इतिहासातील प्रतिकांचा आदर करायला शिका, असे शिंदे म्हणाले.
थोरात यांना छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास कळणार नाही
राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर शिंदे यांनी टीका केली आहे. थोरात यांना टिळक वाड्यात बसून छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास कळणार नाही आणि पचणारही नाही. आमचा वारसा आम्हाला गौरवपूर्ण चालवू द्या, असा चिमटाही त्यांनी काढला.
( हेही वाचा: वकिलांची नोकरी धोक्यात; आता ‘रोबो वकिल’ म्हणणार ‘माय लाॅर्ड’ )
स्मार्ट सिटीच्या कॅम्पेनिंगमध्ये संभाजीनगर नावाचा उल्लेख केल्यामुळे औरंगबादेत पु्न्हा एकदा वादाला सुरुवात झाली होती. स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत शहराचे नाव असलेले औरंगाबादचे फलक लावण्यात आले. त्यात आय लव्ह औरंगाबाद, लव्ह प्रतिष्ठान, लव्ह खडकी असे डिस्प्ले लावून सेल्फी पाॅईंट तयार करण्यात आले आहेत. ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांच्या मातृभूमी प्रतिष्ठान शहरातील टीव्ही सेंटर भागातील संभाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ सुपर संभाजीनगर असा डिस्प्ले तयार केला होता.