Facebook,Twitter ची आता सरकारकडे करा तक्रार; काय आहे सरकारचा निर्णय?

139

सोशल मीडिया युजर्सना आता थेट सरकारकडे ट्वीटर आणि फेसबूक संबंधित तक्रार करता येणार आहे. सरकारकडून तक्रार कक्ष स्थापन करण्यात येत आहे. पुढील तीन महिन्यांमध्ये सरकार तक्रार समिती स्थापन करेल, जिथे युजर्सना ट्वीटर आणि फेसबूक संबंधित तक्रार दाखल करता येईल. भारताचे नियम ट्वीटरवर लागू होत नसल्याचे कारण ट्वीटरने भारत सरकारला दिले होते. त्यानंतर सरकारने तक्रार समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे यापुढे तुम्हाला फेसबूक आणि ट्वीटरसारख्या सोशल मीडिया प्लॅटफाॅर्मबाबत काही तक्रार करायची असेल तर सरकारच्या तक्रार कक्षाची मदत होणार आहे.

सरकारचे मोठे पाऊल

सरकारने स्थापन केलेली ही तक्रार समिती सोशल मीडिया कंपन्यांमुळे युजर्सना होणा-या समस्या आणि तक्रारी ऐकून घेऊन त्यांचे निवारण करेल. केंद्र सरकारने शुक्रवारी 28 ऑक्टोबर रोजी याबाबत एक अधिसूचना जारी केली आहे. या अधिसूचनेमध्ये सरकारने सांगितले आहे की वापरकर्त्यांच्या तक्रारीसाठी पुढील तीन महिन्यांमध्ये सरकारकडून तक्रार समिती स्थापन करण्यात येईल. फेसबूक आणि ट्विटरच्या मोठ्या टेक कंपन्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारचे हे मोठे पाऊल आहे.

( हेही वाचा: मविआच्या 15 नेत्यांची सुरक्षा काढली,नार्वेकरांच्या सुरक्षेत मात्र वाढ; शिंदे सरकारचा निर्णय )

अशी असणार तक्रार समिती

सरकार स्थापन करत असलेल्या या तक्रार समितीमध्ये एक अध्यक्ष आणि केंद्र सरकारद्वारे नियुक्त केलेले दोन सदस्य असतील. दोन सदस्य पूर्णवेळ कार्यरत असतील. तक्रार अधिका-यांच्या निर्णयावर असमाधानी असलेली कोणतीही व्यक्ती तक्रार अधिका-यांशी संवाद साधल्यानंतर 30 दिवसांच्या आत या तक्रार अपलील समितीकडे अपील करु शकते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.