करचोरी करणा-यांची नावे कळवा आणि बक्षीस मिळवा

122

अनेक लोकांकडून केंद्रीय वस्तू व सेवा कर अर्थात जीएसटी भरणा करण्यामध्ये होणारी टाळाटाळ अथवा हेतुपुरस्सर करण्यात येणा-या करचोरीला पायबंद घालण्यासाठी जीएसटी विभागाच्या गुप्तचर विभागाने आता बक्षीस योजना जाहीर केली आहे. आतापर्यंत करचोरी पकडणा-या विभागाच्या अधिका-यांसाठी ही योजना लागू होतीच. आता, मात्र सामान्य नागरिकांसाठीदेखील ही योजना विभागाने जारी केली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, लहान- मोठे व्यापारी अनेक प्रकरणात जीएसटी भरणा करत नाहीत अथवा जेवढा व्यवहार झालेला आहे, त्याच्या प्रमाणात करभरणा करत नसल्याचे जीएसटी विभागाच्या पाहणीत आढळून आले आहे. GST विभागामध्ये कर संकलन आणि विश्लेषणासाठी विशेष साॅफ्टवेअर आहे. या माध्यमातून कंपन्यांचा ताळेबंद, त्यांच्यातर्फे भरणा होणारा कर, याचे विश्लेषण विभागाच्या अधिका-यांना एका क्लिकवर प्राप्त होते. मात्र, तरीही देशातील व्यवसाय आणि अपेक्षित कर संकलन यामध्ये तफावत असल्याचे दिसून येते.

कर संकलनाची व्याप्ती वाढवण्यासाठी सामान्य नागरिकांनाही करचोरी करणा-या लोकांची माहिती देण्याचे आवाहन केले असून, ही माहिती दिल्यानंतर तसेच त्या माहितीची उचित पडताळणी झाल्यानंतर माहिती देणा-या संबंधित व्यक्तीला बक्षीस देण्यात येणार आहे.

कशी कळवाल माहिती?

करचोरी पकडणा-या अधिका-यांना सध्या जेवढ्या रकमेची करचोरी पकडण्यात येते, किंवा जेवढा माल जप्त होतो त्याची जेवढी विक्री किंमत आहे त्याच्या 20 टक्के रक्कम ही बक्षिसापोटी दिली जाते. त्यामुळे तेवढीच रक्कम नागरिकांनाही दिली जाणार आहे.

अशी कळवा माहिती

एखाद्या प्रकरणात करचोरी झाल्याची जर ठोस माहिती असेल तर विभागीय कार्यालयामध्ये ती माहिती पत्राद्वारे, ईमेलद्वारे किंवा विभागाच्या वेबसाईटवर जाऊन देता येईल. माहिती देणा-या व्यक्तीचे नाव गुप्त राखण्यात येईल, असे विभागातील अधिका-यांनी सांगितले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.