दरवर्षी प्रजासत्ताक दिनी विविध राज्यांच्या चित्ररथांचे दिल्लीत संचालन केले जाते. यंदाच्या संचालनात महाराष्ट्राच्या चित्ररथासाठी कास पठाराला मानांकन देण्यात आले आहे. रानफुलांची ओळख असणारं हे कास पठार आणि महाराष्ट्रातील जैवविविधता मानकांचा समावेशावर आधारित चित्ररथ सादर केला जाणार आहे.
जागतिक वारसा स्थळाचा दर्जा
दरवर्षी प्रजासत्ताक दिनी 26 जानेवारीला नवी दिल्ली येथे संचलन केले जाते. या कार्यक्रमात विविध राज्यांच्या चित्ररथांचे संचालन केले जाते. या चित्ररथांमधून प्रत्येक राज्य आपली संस्कृती दाखवत असते. यंदाच्या महाराष्ट्रातील चित्ररथासाठी कास पठाराची निवड करण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यातील कास पठार हे पावसाळ्यात उमलणा-या रानफुलांसाठी सर्वत्र प्रसिद्ध आहे. या पठारावर शेकडो प्रजातींची लक्षवेधी फुले पावसाळ्याच्या चार महिन्यांत उमलतात. या विविधरंगी फुलांनी हे पठार रंगीबेरंगी दिसू लागते. हा निसर्गरम्य नजारा पाहण्यासाठी दरवर्षी हजारो पर्यटक या स्थळाला भेट देतात. या जागेचे जैववैविध्य लक्षात घेत युनेस्कोने 2012 मध्ये कास पठाराला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा बहाल केला आहे.
( हेही वाचा :मध्य रेल्वेच्या ‘या’ एक्सप्रेस गाड्या रद्द! कारण जाणून घ्या…)
म्हणून तयार करण्यात आला चित्ररथ
यंदा प्रजासत्ताक दिनी होणा-या संचालनामध्ये महाराष्ट्राच्या समृद्ध जैवविविधतेचे दर्शन घडवण्याच्या हेतूने कास पठाराचा विषय निवडण्यात आला आहे आणि त्यावर आधारित चित्ररथ तयार करण्यात आला आहे.
Join Our WhatsApp Community