यंदा महाराष्ट्राचा चित्ररथ राजपथावर दिसणार नाही, वाचा कारण

239

प्रजासत्ताक दिनी दिल्लीत होणा-या संचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथाला केंद्र सरकारने परवानगी नाकारली आहे. २६ जानेवारीला राजपथावर होणाऱ्या संचलनात देशातील प्रत्येक राज्याच्या संस्कृतीचे प्रतिक असणारे चित्ररथ सहभागी होत असतात. यामध्ये विविध राज्यांच्या चित्ररथांना प्रत्येकवर्षी ठराविक निकषांनुसार संधी दिली जाते. त्याप्रमाणे यंदा महाराष्ट्राचा चित्ररथ राजपथावर दिसेल, अशी आशा होती. परंतु, केंद्र सरकारने महाराष्ट्राच्या चित्ररथाला परवानगी नाकारली आहे.

प. बंगालच्याही चित्ररथाला परवानगी नाही 

यंदाच्या पश्चिम बंगालच्या चित्ररथात नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त चित्ररथ साकारण्यात आला आहे. मात्र, केंद्र सरकारने परवानगी नाकारल्याने, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपली नाराजी पत्राद्वारे व्यक्त केली आहे. ममता यांनी आपल्या पत्रात, केंद्र सरकारच्या या व्यवहारामुळे लोकांना धक्का बसला आहे. देशाला 75 वर्ष पूर्ण होत असताना, देशातील बहादूर स्वातंत्र्य सेनानींच्या योगदानावर आधारित चित्ररथाला जागा न मिळणं संतापजनक आहे. या आशयाचं पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहीलं आहे.

( हेही वाचा: कोरोनादरम्यान ‘या’ राज्यांत सर्वाधिक बालकांचं हरवलं छत्र )

यंदा इतक्या चित्ररथांची निवड

यंदाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त केंद्र सरकारने 22 चित्ररथांची निवड केली आहे. यामध्ये विविध विभाग आणि मंत्रालयाच्या 6 चित्ररथांची निवड केली आहे. तर राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या 16 चित्ररथांचा समावेश आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.