प्रजासत्ताक दिन २०२२ : पोलिस, अग्निशमन दलातील ‘या’ कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पदके जाहीर!

142

प्रजासत्ताक दिनी पोलिस, अग्निशमन सेवा, नागरी संरक्षण आणि गृहरक्षक दलाच्या जवानांना शौर्य पदक आणि विशिष्ट सेवांसाठी राष्ट्रपती पदक तसेच शौर्य पदक आणि गुणवंत सेवा पदके प्रदान केली जातात. २०२२ च्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ४२ जवानांना अग्निशमन सेवा पदके घोषित करण्यात आली. यापैकी १ जवानास राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदक आणि २ जवानांना त्यांच्या संबंधित शौर्याबद्दल, शौर्यासाठीचे अग्निशमन सेवा पदक जाहीर करण्यात आले आहे.

विशिष्ट सेवेसाठी ९ कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदक तर, ३० कर्मचाऱ्यांना त्यांच्या संबंधित विशिष्ट आणि गुणवत्तापूर्ण उत्कृष्ट सेवांसाठी अग्निशमन सेवा पदक यांची घोषणा करण्यात आली. याव्यतिरिक्त, २५ कर्मचारी/स्वयंसेवकांना २०२२ च्या प्रजासत्ताक दिनानिमित्त गृहरक्षक आणि नागरी संरक्षण पदके देखील जाहीर करण्यात आली आहेत.

(हेही वाचा सेनेकडून टिपूचे पुन्हा उद्दात्तीकरण! प्रजासत्ताकदिनी धर्मांधतेला प्रोत्साहन)

अग्निशमन सेवेतील पदकांचे मानकरी 

  1. महाराष्ट्रातील फायरमन शे.बाळू दामू देशमुख यांना बचावकार्यासाठी मरणोत्तर शौर्यासाठीचे राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदक जाहीर करण्यात आले.
  2. शे.प्रशांत दादाराम रणपिसे (मुख्य अग्निशमन अधिकारी) यांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदक जाहीर करण्यात आले.
  3. गुणवत्तापूर्ण उत्कृष्ट सेवांसाठी अग्निशमन सेवा पदक प्राप्त करणाऱ्यांमधे महाराष्ट्रातील पुढील विजेत्यांचा समावेश आहे :
  4. शे.किरण बालमुकुंद गावडे, मुख्य अग्निशमन अधिकारी
  5. शे.संजय यशवंत मांजरेकर, उपमुख्य अग्निशमन अधिकारी
  6. शे.सुरेश विष्णू पाटील, लिडींग फायरमन
  7. शे.संजय दत्ताराम म्हामुणकर, लिडींग फायरमन
  8. शे. चंद्रकांत नारायण आनंददास, फायरमन

पोलिस दलातील पदकांचे मानकरी 

महाराष्ट्र पोलीस दलातील अधिकारी गोपाळ उसेंडी, महेंद्र कुलेटी, संजय बकमवार, भारत नागरे, दिवाकर नरोटे, निलेश्वर पड, संतोष पोटावी यांना शौर्य पोलीस पदक, तर अतिरिक्त पोलीस महासंचालक विनय कारगांवकर, एसआरपीएफचे कमांडट प्रल्हाद खाडे, पोलीस निरीक्षक चंद्रकांत गुंडगे, पोलीस उपनिरिक्षक अन्वरबेग मिर्झा यांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपतींचे पोलीस पदक जाहीर झाले आहे. याशिवाय महाराष्ट्र पोलीस दलातील ४० अधिकाऱ्यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठीचे पोलीस पदक जाहीर झाले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.