स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे जन्मस्थान असलेल्या भगूर गावातील सावरकर वाड्यामध्ये आज भारताचा ७४ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सेवानिवृत्त सरकारी अधिकारी बाळासाहेब गायधनी यांनी ध्वजावतरण केले तर सहाय्यक पोलीस आयुक्त अविनाश धर्माधिकारी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने सावरकर यांच्या भगूर येथील या स्मारकाच्यावतीने बाळासाहेब गायधनी, डॉ. प्रतिभा पाटील, अॅड. संजय पाटील यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी भगूरकर नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश बुरके यांनी केले.
( हेही वाचा: स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात ७४ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा )

