Republic Day 2024 : बग्गीला आले सोनेरी दिवस

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे पारंपरिक गाडीत बसून प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात आगमन झाले. १९८४ नंतर प्रथमच राष्ट्रपतींनी प्रजासत्ताकदिनी ही गाडी चालवली.

250
Republic Day 2024 : बग्गीला आले सोनेरी दिवस
Republic Day 2024 : बग्गीला आले सोनेरी दिवस

ब्रिटिश कालीन बग्गी जेव्हा जायची तेव्हा लोकं अगदी उत्सुकतेने बघत राहायचे. तशीच काहींशी उत्सुकता शुक्रवारी (२६ जानेवारी) राष्ट्रपतीच्या बग्गीला पाहून उपस्थित प्रेक्षकांमध्ये जाणवली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu) यांचे पारंपरिक गाडीत बसून प्रजासत्ताक दिनाच्या (Republic Day) कार्यक्रमात आगमन झाले. १९८४ नंतर प्रथमच राष्ट्रपतींनी प्रजासत्ताक दिनी (Republic Day) ही गाडी चालवली. या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन (Emmanuel Macron) हेही त्यांच्यासोबत गाडीत बसून कर्तव्य पथावर आले. (Republic Day 2024)

१९५० मध्ये प्रजासत्ताक दिनी (Republic Day) ही बग्गी पहिल्यांदा वापरण्यात आली होती. ही परंपरा १९८४ पर्यंत चालू होती. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर उच्च सुरक्षा कवच असलेल्या गाड्यांचा वापर सुरू झाला. १९५० मध्ये पहिल्या प्रजासत्ताक दिनाच्या (Republic Day) सोहळ्यात, राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी या बग्गीत बसून राजपथावर झालेल्या परेडमध्ये भाग घेतला होता. सुरुवातीच्या काळात भारताचे राष्ट्रपती या गाडीतून सर्व समारंभांना जात असत आणि ३३० एकरांत पसरलेल्या राष्ट्रपती भवनातही ते फिरत असत. ही सोन्याचा मुलामा असलेली बग्गी मूळची भारतात ब्रिटिश राजवटीत व्हाईसरॉयची होती. १९४७ मध्ये स्वातंत्र्यानंतर गव्हर्नर जनरलचे अंगरक्षक, ज्यांना आता राष्ट्रपतींचे अंगरक्षक म्हणून ओळखले जाते, भारत आणि पाकिस्तानमध्ये २:१ च्या प्रमाणात विभागले गेले. व्हाइसरॉयच्या बग्गीची पाळी आली तेव्हा दोन्ही देशांनी त्यावर आपले दावे मांडायला सुरुवात केली. (Republic Day 2024)

(हेही वाचा – Republic Day : सर्वसमावेशक, प्रगतीशील, पुरोगामी, विकसित महाराष्ट्र घडविणार – राज्यपाल)

पहिल्यांदाच बग्गीचा वापर

शेवटी नाणेफेकीचा निर्णय झाला. प्रेसिडेंट्स बॉडीगार्ड रेजिमेंटचे पहिले कमांडंट लेफ्टनंट कर्नल ठाकूर गोविंद सिंग आणि पाकिस्तानी लष्कराचे साहबजादा याकूब खान यांच्यात टॉस झाला. यामध्ये भारताचा विजय झाला आणि त्यामुळे भारताला ही गाडी मिळाली. २०२४ मध्ये तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी बुलेट प्रूफ वाहनाने राष्ट्रपती येण्याची परंपरा बदलली. जवळपास तीन दशकांनंतर, २९ जानेवारी रोजी होणाऱ्या बीटिंग रिट्रीटमध्ये सहभागी होण्यासाठी ते बग्गीतून आले होते. तेव्हापासून या गाडीचा औपचारिक वापर केला जात असला तरी प्रजासत्ताक दिनानिमित्त (Republic Day) पहिल्यांदाच या गाडीचा वापर करण्यात आला आहे. (Republic Day 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.