स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जन्मस्थळी भगूर (Bhagur) येथील स्मारकात प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. (Republic Day) नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाचे सहआयुक्त शाम गोसावी यांच्या उपस्थितीत ध्वजवंदन करून 75 वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. या वेळी भारतीय सैनिक नवनाथ पाळदे आणि शशांक शुक्ल हेही उपस्थित होते.
(हेही वाचा – Republic Day : स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात ध्वजवंदन)
‘स्वातंत्र्यलढ्यातील स्वातंत्र्यवीर सावरकरांचे (Veer Savarkar) योगदान खूप मोठे आहे. यांच्या जन्मस्थळी ध्वजारोहण करण्याचा मान मिळाला. हा दिवस माझ्या कायम विस्मरणात राहील’, असे उद्गार शाम गोसावी यांनी या वेळी व्यक्त केले.
उपस्थित पाहुण्यांचा सत्कार स्मारकाचे भूषण कापसे आणि मनोज कुवर यांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश बुरके यांनी केले, तर आभारप्रदर्शन मनोज कुवर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी खंडू रामगडे, दीपक गायकवाड, आकाश नेहेरे, गणेश राठोड, शंकर मुंढारे, मंगेश मरकड, संतोष मोजाड, संभाजी देशमुख आदींनी प्रयत्न केले. (Republic Day)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community