यंदा मुंबईच्या संकल्पनेवर असणार नौदलाचा चित्ररथ!

111

यंदा प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी राजपथावर युनेस्कोने मान्यता दिलेल्या सूचीमध्ये महाराष्ट्रातील ‘कास पठार’चा चित्ररथ असणार आहे. प्रजासत्ताक दिन संचलनात वेगवेगळ्या विभागांचे तसेच राज्यांचे चित्ररथदेखील सहभागी होत असतात. त्यासाठी यंदा केंद्र सरकारने ‘आत्मनिर्भर भारत’ व ‘स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव’, ही संकल्पना सर्व विभागांना दिली होती. त्यानुसार नौदलानेदेखील या दोन संकल्पनांवर आधारित चित्ररथ तयार केला जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

चित्ररथात युद्धनौकांच्या प्रतिकृती ‘आत्मनिर्भर भारत’ या नात्याने

मिळालेल्या माहितीनुसार, हा चित्ररथ प्रामुख्याने मुंबईवर आधारलेला आहे. चित्ररथाच्या दर्शनी भागात मुंबईतील नौसैनिकांचा इतिहास दर्शविण्यात येणार आहे. या बंडाने ब्रिटीश साम्राज्याला हादरा बसला होता. या बंडानंतरच ब्रिटिशांनी खऱ्या अर्थाने देश सोडण्याचे ठरवले होते. त्याखेरीज आत्मनिर्भर भारतचेदर्शन घडविण्यासाठी नौदलाने त्यांच्या चित्ररथावर भारतात तयार झालेल्या किंवा होणाऱ्या युद्धनौका दर्शविल्या असतील.

यासह नव्यानेच नौदलात दाखल करून घेतलेल्या ‘आयएनएस विशाखापट्टणम’ या युद्धनौकेची प्रतिकृती असेल. या युद्धनौकेचा मुख्य तळ मुंबईतच आहे. याखेरीज ‘आयएनएस दिल्ली’, ‘आयएनएस गोदावरी’, ‘आयएनएस कलवरी’ (पाणबुडी) श्रेणी या मुंबईतील माझगाव डॉकमध्ये तयार झालेल्या पश्चिम कमांडचा भाग असलेल्या युद्धनौकांच्या प्रतिकृती ‘आत्मनिर्भर भारत’ या नात्याने चित्ररथात असतील.

(हेही वाचा –मुंबईपाठोपाठ ‘या’ शहरातील हवेची गुणवत्ता खालावली)

महिला अधिकाऱ्याकडे संचलन तुकडीचे नेतृत्व 

नौदलाच्या संचलन तुकडीचे नेतृत्व मागील वर्षीप्रमाणे यंदादेखील एका महिलेकडे आहे. लेफ्टनंट कमांडर आंचल शर्मा या महिला अधिकाऱ्याकडे या तुकडीचे नेतृत्व असणार आहे. लेफ्टनंट शर्मा यांचादेखील मुंबईशी अप्रत्यक्ष संबंध आहे. मुंबईत मुख्यालय असलेल्या पश्चिम नौदल कमांडमधील पोरबंदर येथील नौदल हवाईतळावर त्या हेलिकॉप्टर वैमानिक म्हणून कार्यरत आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.