Republic Day : महाराष्ट्रातील तिघांना ‘जीवन रक्षा पदक’ पुरस्कार जाहीर

39
Republic Day : महाराष्ट्रातील तिघांना ‘जीवन रक्षा पदक’ पुरस्कार जाहीर
  • प्रतिनिधी 

दैनंदिन जीवनात मानवाच्या संरक्षणासाठी उत्तम कामगिरी बजावणाऱ्या देशातील एकूण 49 व्यक्तींना शनिवारी ‘जीवन रक्षा पदक’ पुरस्कार जाहीर झाले आहेत. यात महाराष्ट्रातील तिघांचा समावेश आहे. राष्ट्रपती यांच्या मान्यतेनंतर केंद्रीय गृहमंत्रालयाच्यावतीने देण्यात येणारे ‘जीवन रक्षा पदक पुरस्कार 2024’ शनिवारी जाहीर झाले. महाराष्ट्रातील शशिकांत रामकृष्ण गजबे यांना ‘उत्तम जीवन रक्षा पदक’ जाहीर झाले. तर ‘जीवन रक्षा पदक’ पुरस्कार दादाराव गोविंदराव पवार, ज्ञानेश्वर मुकुंदराव भेदोडकर, यांना जाहीर करण्यात आले. (Republic Day)

(हेही वाचा – Republic Day : राष्ट्रीय विद्यालय बँड स्पर्धेत नाशिक भोसला मिलीटरी शाळेला व्दितीय पुरस्कार)

देशातील 49 नागरीकांना तीन श्रेणीत हे पुरस्कार जाहीर करण्यात आले. यातील 17 नागरिकांस ‘सर्वोत्तम जीवन रक्षा पदक पुरस्कार’ जाहीर करण्यात आला. यामध्ये पाच व्यक्तींना मरणोपरांत पुरस्कार प्रदान करण्यात येईल. देशातील 09 जणांना ‘उत्तम जीवन रक्षा पदक पुरस्कार’ जाहीर झाले असून एका व्यक्तींस मरणोपरांत पुरस्कार प्रदान करण्यात येईल. ‘जीवन रक्षा पदक पुरस्कार’ एकूण 23 जणांना जाहीर झाले आहेत. या पुरस्काराचे स्वरूप पदक, केंद्रीय गृहमंत्री यांच्या हस्ताक्षरातील प्रमाणपत्र आणि रोख रकम असे आहे. पुरस्कार जाहीर झाल्यानंतर काही कालावधीने देशातील संबंधीत राज्य शासनाच्यावतीने हे पुरस्कार प्रदान करण्यात येतील. (Republic Day)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.