लोणावळ्यातील कातळधार धबधब्याजवळ वर्षविहारासाठी आलेली तरुणी खोल दरीत पडून अडकल्याची घटना समोर आली. त्यांनतर शिवदुर्ग रेस्क्यू टीमच्या अथक प्रयत्नानंतर तरुणीला वाचविण्यात यश आले आहे. खोल दरीत पडलेली तरूणी सध्या सुखरूप आहे.
(हेही वाचा – महाराष्ट्रात शिवसेनेचा अंत, देशात फक्त भाजपच राहणार – जेपी नड्डा)
मिळालेल्या महितीनुसार, सुप्रिया गवणे ही आपल्या 6 मित्रांसोबत कातळधार धबधबा बघण्यासाठी आणि ट्रेकिंगसाठी आली होती. मात्र अचानक मोठ्या दगडावरून सुप्रियाचा पाय घसरला आणि ती एका खोल दरीत जाऊन अडकली. पाय फ्रॅक्चर झाल्याने तिला चालता येत नव्हते. त्यामुळे तिथल्याच दुसऱ्या ट्रेक मधील प्राजक्ता बनसोड नावाच्या मुलीने तात्काळ मदतीसाठी शिवदुर्ग रेस्क्यू टीमला घटनेची माहिती दिली.
माहिती मिळताच टीमचे सदस्य घटनास्थळी दाखल झाले. जवळपास 2 तासांच्या अथक प्रयत्नानंतर सुप्रियाला रेस्क्यू करत सुखरूप बाहेर काढण्यात आले आणि तात्काळ जवळील रुग्णालायत पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले. सुप्रिया गवणे ही मूळ नागपूरची असून पुण्यात नोकरी करते. आपल्या मित्रांसोबत ती रविवारी फिरायला लोणावळा परिसरात आली होती. त्यावेळी ही घडना घडल्याचे सांगितले जात आहे.
Join Our WhatsApp Community