वरळी डेअरीच्या जागेवर मरीन अ‍ॅक्वारियमचे आरक्षण : दुग्धशाळेचा जागेवरील अधिकार संपुष्टात

236

वरळी डेअरीच्या काही जमिनींपैकी काही ठराविक भाग हा मरीन रिसर्च इन्स्टिट्यूट अ‍ॅक्वारियम, एक्झिबीशन सेंटर करता आरक्षित करण्याचा निर्णय घेण्यात आला असून या जमिनी संदर्भातील आरक्षण फेरबदल करण्यात येत आहे. याबाबतचा प्रस्ताव महापालिका सुधार समितीच्या बैठकीमध्ये मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे.

मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील बैठक 

वरळी डेअरीच्या जमिनीवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन संकुल आणि मत्स्यालय विकसित करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी चालू अर्थसंकल्पात केली होती. त्यानुसार राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी १८ मार्च २०२१ रोजी आणि राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील ८ सप्टेंबर २०२१ रोजी बैठक घेण्यात आली होती. या बैठकांमध्ये वरळी दुग्धशाळा अर्थात वरळी डेअरीच्या जमिनीपैकी काही ठराविक भाग हा मरीन रिसर्च इन्स्टिट्यूट अ‍ॅक्वारियम, एक्झिबीशन सेंटर करता आरक्षित करून विकसित करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र या आरक्षणात फेरबदल करताना या जमिनीवर असलेल्या विद्यमान प्रशासकीय इमारत ही दुग्ध विकास विभागाकडे कायम राहणार आहे. तसेच उर्वरीत जागेवर शासकीय कार्यालय होईल, असे आरक्षण कायम ठेवण्याचा दृष्टीकोनातून आरक्षण बदल करण्यात आला होता.

(हेही वाचा लेफ्ट. कर्नल प्रसाद पुरोहित सैन्याधिकारी, देशसेवेबाबत त्यांचा अभिमान! प्रसाद लाड यांची भूमिका)

महापालिकेच्यावतीने हरकती व सूचना मागवल्या

त्यामुळे या जमिनीवरील विद्यमान आरक्षण हे काही भागांमध्ये मरीन रिसर्च इन्स्टिट्यूट अ‍ॅक्वारियम, एक्झिबीशन सेंटर असे फेरबदल करण्याबाबत शासनाच्या नगररचना विभागाच्या उपसंचालकांद्वारे हरकती व सूचना नोंदवून त्यानुसार शिफारस करण्यात आली आहे. शासनाने केलेल्या सूचनेवर नियोजन प्राधिकरण म्हणून महापालिकेच्यावतीने हरकती व सूचना मागवण्यासाठी सुधार समितीच्या सभेपुढे हा आरक्षण फेरबदलाचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.