तुमचे ‘या’ बँकेत खाते तर नाही ना? RBI ने ठोठावला ३ बँकांना दंड!

172

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल ३ सहकारी बँकांना दंड ठोठावल्याचे समोर आले आहे. तुमचे यापैकी कोणत्याही बँकेत खाते असेल तर लगेच तपासा… रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने या तिन्ही बँकांना ५ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. त्यापैकी दोन बँका महाराष्ट्रातील आणि एक पश्चिम बंगालमधील आहे. याआधी मार्चमध्येही रिझर्व्ह बँकेने नियमांचे पालन न केल्याने ८ बँकांना दंड ठोठावला असल्याची माहिती आहे.

या बँकांचा आहे समावेश

मिळालेल्या माहितीनुसार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यासंदर्भात एक निवेदन जारी केले आहे. या निवेदनानुसार, फलटन येथील यशवंत को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडला उत्पन्न, मालमत्ता वर्गीकरण, तरतुदी आणि इतर समस्यांवरील सूचनांचे पालन न केल्याबद्दल २ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. मुंबईमध्ये असणाऱ्या कोकण मर्केंटाइल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडलाही २ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तसेच, कोलकाता येथील समता को-ऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट बँकेलाही १ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

(हेही वाचा – दुसरा धक्का! आणखी एका पदाधिकाऱ्याचा मनसेला रामराम )

यापूर्वीही ८ बँकांना आकारला दंड

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने याआधी देखील १४ मार्च २०२२ रोजी मध्य प्रदेश, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, मणिपूर, गुजरात, हिमाचल आणि उत्तर प्रदेशातील ८ सहकारी बँकांना १२ लाखांहून अधिक रुपयांचा दंड आकारला होता. भारतीय रिझर्व्ह बँकांचे नियम आणि सूचनांचे पालन न केल्याने या बँकांना दंड ठोठावण्यात आला होता. या अंतर्गत आरबीआयने मणिपूर महिला सहकारी बँक लिमिटेड (मणिपूर), युनायटेड इंडिया सहकारी बँक लिमिटेड (उत्तर प्रदेश), जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक (नरसिंहपूर), अमरावती मर्चंट सहकारी बँक लिमिटेड (अमरावती), फैज मर्केंटाइल सहकारी बँक लिमिटेड (नाशिक) आणि नवनिर्माण सहकारी बँक लिमिटेड (अहमदाबाद) यांना दंड ठोठावण्यात आला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.