तुमचा EMI महागणार, RBI कडून रेपो दरात 50 बेसिस पॉईंट्सची वाढ

165

भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो दरात वाढ केली आहे. आरबीआयचे गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांनी आरबीआयचे पतधोरण जाहीर केले. चलनविषयक धोरण समितीचे निर्णय जाहीर करताना रेपो दरात 50 बीपीएस पॉईंट म्हणजे 0.50 टक्के बेसिस पॉईंट्सची वाढ करण्यात आली आहे.

 

यामुळे सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांचा ईएमआय वाढणार असून त्यांना या वाढीला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे नवे कर्जेदेखील महागतील. दरम्यान, आरबीआयच्या या व्याज दरवाढीनंतर आता व्याज दर 5.90 टक्के इतका झाला आहे. जो पूर्वी 5.40 टक्क्यांवर होता. वर्ष 2023 मध्ये विकास दर हा 7 टक्के राहण्याचा अंदाज आरबीआयने व्यक्त केला आहे. याआधी आरबीआयकडून विकास दर 7.2 टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मागील पाच महिन्यात व्याज दरात 1.90 टक्क्यांची वाढ झाली आहे. याआधी व्याज दर 5.40 टक्के इतका होता. आता, व्याज दर 5.90 टक्के इतका झाला आहे.

यावेळी शक्तिकांत दास यांनी सांगितले की, कोरोना महासाथ, रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम जाणवत आहे. जगभरातील अर्थव्यवस्थांवर परिणाम जाणवत आहे. महागाईवरील नियंत्रणासाठी व्याज दरात वाढ केली जात आहे. रेपो दरात वाढ करण्याचा निर्णय हा पाच विरुद्ध एक अशा बहुमताने घेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.मागील अडीच वर्षात जगाला कोरोना महासाथरोग आणि रशिया-युक्रेन युद्धाला सामोरे जावे लागले. जागतिक पातळीवर सातत्याने आव्हानात्मक परिस्थिती असतानादेखील भारतीय अर्थव्यवस्थेने त्याचा धैर्याने सामना केला. देशातील ग्रामीण भागात मागणी वाढली असून गुंतवणुकीतही सुधारणा दिसून येत असल्याचे दास यांनी सांगितले.

(हेही वाचा – ठाकरे गटाला धक्का; ज्यांनी एकनिष्ठतेचे प्रमाणपत्र दिले त्यांनीच शिंदे गटात केला प्रवेश)

या वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत महागाईचा दर 6 टक्के राहण्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला. दास म्हणाले की, महागाई वाढण्याचा धोका अजूनही कायम असून आव्हानात्मक काळात देशाची आर्थिक स्थिती मजबूत असल्याचे ते म्हणाले. सणासुदीच्या काळात मागणी वाढल्याने महागाई आणखी वाढण्याची शक्यता आहे.रेपो दरात वाढ केल्याने सर्व प्रकारचे कर्जे महाग होणार आहे. वास्तविक रेपो दराच्या माध्यमातून आरबीआय बँकांना कर्ज देते. तर, याउलट रिव्हर्स रेपो रेट हा व्याज दर आहे जो मध्यवर्ती बँक आरबीआयकडे पैसे ठेवण्यासाठी बँकांना देते. त्यामुळे सामान्यतः असे मानले जाते की, जर आरबीआयने रेपो दर कमी केला तर बँका व्याजदर कमी करतात. तर, आरबीआयने जर रेपो दर वाढवला तर, बँका व्याजदर वाढवू शकतात. त्यामुळे सर्वसामान्यांनी घेतलेल्या कर्जेचे हप्ते महाग होऊ शकतात.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.