ऋजुता लुकतुके
रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर (Reserve Bank Monetary Policy) शक्तिकांत दास यांनी रेपोदर ६.५ टक्क्यांवर स्थिर ठेवण्याचा निर्णय आज जाहीर केला. तीन दिवसांच्या बैठकीनंतर सलग सहाव्यांदा रिझर्व्ह बँकेनं रेपोदरात कुठलाही बदल केला नाही. पण, महागाई दर आणि औद्योगिक उत्पादन वाढलं तर पुढील पतधोरणात रेपोदर कमी करण्याचं सुतोवाचही दास यांनी केलं.
रिझर्व्ह बँकेच्या पाचही तज्जांनी रेपोरेट स्थिर ठेवण्याच्या बाजूनेच कौल दिला. मे २०२२ ते डिसेंबर २०२२ या कालावधीच रेपोरेट २५० अंशांनी वाढला होता. आणखी एक महत्त्वाची घोषणा करताना शक्तिकांत दास यांनी आर्थिक वर्ष २०२४ साठीचा जाडीपी वृद्धिदर ६.५ टक्क्यांवरून ७ टक्क्यांवर आणला आहे. या दोन सकारात्मक गोष्टी मानल्या जात आहेत.
RBI Governor Shaktikanta Das announces that RBI increases the repo rate by 25 basis points to 6.5% pic.twitter.com/2ZyUSbCxEO
— ANI (@ANI) February 8, 2023
रिझर्व्ह बँकेचं (Reserve Bank Monetary Policy) पतधोरण मांडताना गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी भारतीय अर्थव्यवस्थेविषयी सांगितलेल्या इतर महत्त्वाच्या गोष्टींवर नजर टाकूया. आणि त्यांच्या भाषणातील महत्त्त्वाचे मुद्दे पाहूया,
-
जागतिक बाजारात अजून म्हणावी तशी स्थिरता आलेली नाही. युद्ध आणि महागाईचं सावट जगावर अजूनही कायम. जगभरात कर्जाचं वाढतं प्रमाण आणि हवामान बदलांचा विपरित परिणाम यामुळे उत्पादनावर परिणाम
-
भारतात रेपोरेट ६.५ टक्क्यांवर कायम ठेवण्याचा निर्णय. त्यामुळे कर्जावरील व्याजदरात वाढ अपेक्षित नाही
-
आर्थिक वर्ष २०२४ साठी किरकोळ महागाई दर ५.४ टक्के राहण्याचा अंदाज
-
जगातील इतर काही प्रगत अर्थव्यवस्थांच्या तुलनेत भारताची स्थिती चांगली असल्याचं शक्तिकांत दास यांनी केलं स्पष्ट
-
तर आर्थिक वर्ष २०२४ साली देशाचा अंदाजे जीडीपी विकासदर ६.५ टक्क्यांवरून ७ टक्क्यांवर आणला