अवघ्या तीन शब्दांत या पठ्ठ्याने दिला राजीनामा; सर्वत्र होतेय चर्चा

103

सोशल मीडियावर अनेक गोष्टी व्हायरल होत असतात. नोकरी ही प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाची बाब असते पण कधी कधी नोकरी ही सोडावी लागते आणि मग राजीनामा द्यावा लागतो पण राजीनामा कसा लिहावा हा प्रश्न प्रत्येकाला पडतो.

सध्या सोशल मीडियावर असाच एक राजीनामा व्हायरल होत आहे. जो तुम्हाला थक्क करेल. हा व्हायरल राजीनामा फक्त तीन शब्दांत लिहिला आहे. या राजीनाम्याची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा होत आहे.

( हेही वाचा New Labour Code : १ जुलैपासून नवे कामगार कायदे! खासगी कर्मचाऱ्यांच्या वार्षिक सुट्ट्यांमध्येही होणार मोठा बदल )

नेटक-यांकडून भरघोस प्रतिसाद

या राजीनाम्याच्या पत्रात केवळ तीन शब्द लिहिले आहे की, बाय बाय सर हे पत्र @MBSVUDU या नावाच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर करत सिंपल असे त्यासोबत लिहिले आहे. राजीनाम्याचे हे पत्र मजेशीर असल्याची प्रतिक्रिया नेटकरी करत आहेत. नेटक-यांकडून या ट्वीटला प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे. तसेच, हजारो लोकांनी या ट्वीटला रिट्वीटही केले आहे. सध्या हे राजीनाम्याचे पत्र चर्चेचा विषय ठरले आहे. अनेकांनी खरचं सीम्पल असे म्हणत कॅप्शनला दुजोरा दिला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.