श्रमजीवी वर्गाला मान, मोफत मेट्रो; जाणून घ्या यंदाच्या प्रजासत्ताक दिनाची वैशिष्ट्ये

166

यंदा भारत ७४ वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. उत्सवांमध्ये कर्तव्यपथावर पारंपारिक संचलन केले जाणार आहे. यामध्ये सशस्त्र दल आणि निमलष्करी दलांच्या तुकड्यांद्वारे भव्य परेडचा समावेश आहे. राज्ये आणि केंद्रीय मंत्रालये, मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम, विजय चौकात बीट द रिट्रीट समारंभ आणि पंतप्रधानांच्या एनसीसी रॅलीशिवाय अॅक्रोबॅटिक मोटरसायकल राइड केले जाणार आहे.

हा भव्य सोहळा पाहण्यासाठी ऑनलाइन तिकिटांचे बुकिंग सुरू झाले आहे. डिजिटल तिकीट असणाऱ्यांना मोफत मेट्रो प्रवासाचा लाभ घेता येणार आहे. रायसीना हील जवळील उद्योग भवन आणि केंद्रीय सचिवालय या दोन मेट्रो स्थानकांसाठी हा प्रवास विनामूल्य असणार आहे.

 श्रमजीवी वर्गाला विशेष निमंत्रण 

यावर्षी, समारंभासाठी निमंत्रित आणि कार्यक्रमस्थळाची डिजिटल तिकीट असणार्‍यांना ‘फ्री मेट्रो राइड’चा लाभ घेता येणार आहे. तसेच,  मेट्रो सेवा 26 जानेवारी रोजी रायसीना हिलजवळील उद्योग भवन आणि केंद्रीय सचिवालय मेट्रो स्टेशन या दोन स्थानकांसाठी विनामूल्य असणार आहेत. यंदाच्या प्रजासत्ताक दिनाचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी रिक्षाचालकापासून भाजीविक्रेत्यांना विशेष निमंत्रण देण्यात आले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, श्रमजीवी, कर्तव्य पथाचे देखभाल करणारे कामगार, त्यांचे कुटुंबीय तसेच रिक्षाचालक, छोटे दुकानदार आणि भाजी विक्रेते या घटकांतील लोक मुख्य व्यासपीठावर आमंत्रित आहेत. या दिनाची संकल्पना ‘सामान्य जनतेचा सहभाग’ यावर आहे.

( हेही वाचा:  माजी आरोग्य मंत्र्यांच्या गाडीला अपघात; दीपक सावंत जखमी )

इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह एल-सिसी प्रमुख पाहुणे 

संरक्षण मंत्रालयानुसार, कोरोना पूर्व काळात आसनक्षमता एक लाखावर होती. ती यंदा ४५ हजारापर्यंत कमी करण्यात आली आहे. VIP निमंत्रण पत्रिकांच्या संख्येत यावेळी लक्षणीय घट करण्यात आली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने  सांगितल्याप्रमाणे, इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह एल-सिसी प्रमुख पाहुणेअसणार आहेत. तसेच इजिप्त लष्करातील १२० सदस्यांची तुकडी देखील या सोहळयात सहभागी होणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.