आता गडकिल्ले, पर्यटन स्थळांवर Weekend ला बिनधास्त फिरायला जा! कारण…

हवामान विभागाने पुणे जिल्ह्यासाठी अतिवृष्टीचा इशारा दिल्याने पर्यटकांच्या सुरक्षेसाठी तसेच अपघाताचा संभाव्य धोका लक्षात घेता फौजदारी दंड संहितेच्या कलम १४४ नुसार जिल्ह्यातील गडकिल्ले, धरण, तलाव, धबधबे आदी पर्यटनस्थळ परिसरात जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी १७ जुलैपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू केले होते. मात्र पुणे जिल्ह्यातील ७ तालुक्यातील गडकिल्ले व पर्यटन स्थळांवर पर्यटनासाठी घातलेली निर्बंध जिल्हा प्रशासनाकडून शिथिल करण्यात आले आहेत.

(हेही वाचा – मुख्यमंत्री शिंदे रिक्षा-टॅक्सी वाल्यांसाठी लवकरच महामंडळ स्थापन करणार)

त्यामुळे आता गडकिल्ले, पर्यटन स्थळांवर Weekend ला बिनधास्त फिरायला जाता येणार आहे. परंतु, जिल्ह्यातील सर्व ठिकाणे पर्यटनासाठी खुली करण्यात आली असली तरी आपत्कालीन परिस्थितीत खबरदारी घेण्याचे आवाहन देखील जिल्हाधिकारी देशमुख यांनी सर्व नागरिकांना केले आहे.

या ठिकाणांवरील हटवले निर्बंध

  • हवेली तालुक्यातील सिंहगड किल्ला, आतकरवाडी ते सिंहगड ट्रेक
  • मावळ तालुक्यातील किल्ले लोहगड, किल्ले विसापूर, किल्ले तिकोणा, किल्ले तुंग, ड्युक्स नोज, भाजे लेणी, भाजे धबधबा, दुधीवरे खिंड, पवना परिसर, राजमाची ट्रेक, किल्ले कातळदरा धबधबा, कोंढेश्वर ते ढाकबेहरी किल्ला, एकविरा लेणी परिसर
  • मुळशी तालुक्यातील अंधारबन ट्रेक, प्लस व्हॅली, कुंडलिका व्हॅली, दिपदरा, कोराईगड, भोर तालुक्यातील रायरेश्वर किल्ला
  • वेल्हा तालुक्यातील किल्ले राजगड, किल्ले तोरणा, पाणशेत धरण परिसर, मढेघाट
  • जुन्नर तालक्यातील किल्ले जीवधन, आंबेगाव तालुक्यातील बलीवरे ते पदरवाडी, भिमाशंकर ट्रेक (बैलघाट, शिडीघाट, गणवतीमार्गे)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here