एसटी कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर शिल्लक रजेचे पैसे व वेतेनवाढीतील फरक दिला जातो. परंतु वेतनवाढीतील हप्ते आणि शिल्लक रजेचे पैसे गेल्या तीन वर्षांमध्ये एसटी कर्मचाऱ्यांना देण्यात आले नाहीत. यामुळे एसटीच्या निवृत्त कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.
( हेही वाचा : Google Maps मुळे तुमचा प्रवास होईल सोपा! टोल, ATM, पेट्रोल पंपांची माहिती मिळणार एका क्लिकवर )
शिल्लक रजेचे पैसे, वेतनवाढीतील फरकापासून वंचित
२०१९ पासून वेतवाढीतील ४८ समान हप्त्यांपैकी काही हप्त्यांची रक्कम, शिल्लक रजेचे पैसे निवृत्त कर्मचाऱ्यांना मिळालेले नाहीत यामध्ये जवळपास दहा हजार निवृत्त कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. अनेक कर्मचाऱ्यांच्या शिल्लक रजेची रक्कम ही दोन लाखांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे ही रक्कम मिळवण्यासाठी कर्मचाऱ्यांना महामंडळाच्या मुख्यालयात फेऱ्या माराव्या लागतात. यावर शिल्लक रजेच पैसे व वेतनवाढीतील हप्त्यांची रक्कम कर्मचाऱ्यांना मिळण्यास उशीर होत आहे हे खरे आहे परंतु गेल्या दोन वर्षांत कोरोनामुळे एसटी महामंडळाला आर्थिक फटका बसला आहे. हळूहळू ही देणी देण्यात येतील असे एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी स्पष्ट केले आहे.
यामुळे अनेक निवृत्त कर्मचाऱ्यांची गैरसोय होत आहे. याबाबत नव्या सरकारने यात लक्ष घालून शिल्लक रजेचा पगार आणि युती सरकारच्या काळात झालेली वेतनवाढ यांचे प्रलंबित हप्ते द्यावेत असे श्रीरंग बरगे यांनी स्पष्ट केले आहे.
स्मार्टकार्ड मुदतवाढ
दरम्यान आषाढी पंढरपुर यात्रा असल्याने सदर यात्रेमध्ये ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून व ज्येष्ठ नागरिकांच्या येत असलेल्या मुदतवाढीच्या मागणीच्या अनुषंगाने ज्येष्ठ नागरिकांचे स्मार्टकार्ड नोंदणीकरण व वितरण (Issuance) करण्यासाठी दिनांक ३१ ऑगस्ट २०२२ पर्यंत मुदत वाढ करण्यात आली आहे असे एसटी महामंडळाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.
Join Our WhatsApp Community