मुलावर झाडल्या वडिलांनी गोळ्या… काय आहे कारण?

जखमी झालेल्या दोन्ही मुलांना ताबडतोब नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सोसायटीतील घराचे मेंटनंन्स भरले नाही या वादातून झालेल्या भांडणात वडिलांनी मुलावर गोळ्या झाडल्याची घटना सोमवारी सायंकाळी नवी मुंबईतील ऐरोली येथे घडली. या गोळीबारात दोन्ही मुले जखमी झाली असून, त्यांना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गोळीबार करणारे वडील हे रिटायर्ड पोलिस अधिकारी आहेत. या प्रकरणी रबाळे पोलिसांनी गुन्हा दाखल करुन वडिलांना अटक केली आहे.

अशी घडली घटना

भगवान पाटील (७०) असे वडिलांचे नाव आहे. भगवान पाटील हे सेवानिवृत्त पोलिस अधिकारी आहेत. ऐरोली सकल सेक्टर-३ येथे राहणारे भगवान पाटील हे लहान मुलगा सुजय सोबत राहत होते. तर त्यांचा मोठा मुलगा विजय हा वसई येथे राहतो. भगवान पाटील हे तापट स्वभावाचे असून, सोमवारी त्यांनी मोठा मुलगा विजय याला फोन करुन ऐरोली येथे घरी बोलावून घेतले. लहान मुलगा सुजय याने सोसायटीचे मेंटनंन्स भरले नाही, म्हणून त्यांच्यात सोमवारी सायंकाळी वाद झाला. या वादातून भगवान पाटील यांनी परवाना असलेली रिव्हॉल्व्हर काढून सुजयवर तीन गोळ्या झाडल्या. त्यापैकी दोन गोळ्या सुजयला लागल्या आणि एक गोळी विजयला चाटून गेली. यामध्ये जखमी झालेल्या दोन्ही मुलांना ताबडतोब नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

(हेही वाचाः गुन्हेगाराला पोलिसांनी नाही तर शिक्षकांनी बोलते केले! कसे? वाचा…)

गुन्हा दाखल

या घटनेची माहिती मिळताच रबाळे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन, भगवान पाटील यांना रिव्हॉल्व्हर सह ताब्यात घेतले आहे. त्यांना हत्येचा प्रयत्न केल्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. जखमी दोन्ही मुलांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर उपचार सूरू असल्याची माहिती रबाळे पोलिसांनी दिली. या प्रकरणी रबाळे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक योगेश गावडे यांनी अधिक बोलण्यास नकार दिला.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here