कर वाचवण्यासाठी ‘इथे’ करा गुंतवणूक !

167

रिटायरमेंटला सुरक्षित आणि तणावमुक्त करण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना अशा गुंतवणूक योजना आवश्यक असतात. ज्या केवळ नियमितपणे रिस्क न घेता परतावा देण्यासह गुंतवणूक आणि परताव्यावरील प्राप्तिकरही वाचवतात. अशा नेमक्या योजना कोणत्या ते पाहू…

किती मिळते कर सवलत?

60 ते 80 वर्षे वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांना वार्षिक 3 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कर सूट मिळते, तर 80 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी ही मर्यादा वार्षिक 5 लाख रुपये आहे. कर सवलतीसह नियमित उत्पन्नासाठी नागरिक या योजनांमध्ये गुंतवणूक करु शकतात.

( हेही वाचा: RBI ने ‘या’ तीन बँकांना ठोठावला दंड; यामध्ये तुमचे अकाऊंट तर नाही ना? )

गुंतवणुकीचे पर्याय कोणते

करमुक्त रोखे
करमुक्त रोखे हे महागाईवर मात करण्याबरोबरच नियमित उत्पन्नासाठी एक चांगला पर्याय आहे. AAA Credit रेटिंग असलेल्या, उच्च तरलता आणि उच्च उत्पन्न ते मॅच्युरिटी असलेल्या करमुक्त बाॅंडमध्ये वृद्धांनी गुंतवणूक करावी.

टॅक्स सेव्हिंग एफडी
ज्येष्ठ नागरिक अधिक सुरक्षित गुंतवणूक आणि नियमित उत्पन्नासाठी 5 वर्षांच्या कर बचत एफडीमध्ये गुतंवणूक करु शकतात. यामध्ये वार्षिक 1.5 लाख रुपयांच्या गुतंवणुकीवर सूट मिळते.

ज्येष्ठ नागरिक बचत योजना
ज्येष्ठ नागिरक बचत योजना सरकारतर्फे चालवली जाणारी योजना असून, यात बॅंक अथवा पोस्टामध्ये खाते उघडले जाते. ही योजना 60 पेक्षा अधिक वयाच्या नागरिकांसाठी सुरु करण्यात आली आहे. योजना सुरु केल्यानंतर 5 वर्षांनी रक्कम मॅच्युअर होते.

पीएम वय वंदन योजना
ही योजना एलआयसीला जोडण्यात आली आहे. यात भारत सरकार अनुदान देते. ज्येष्ठ नागरिकांना योजनेत 10 वर्षांपर्यंत एका ठराविक दराने पेन्शन मिळते. 60 वर्षांपेक्षा अधिक वयाचे नागरिक येथे गुंतवणूक करु शकतात.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.