काय सांगताय! राज्यातील ‘हे’ आहे सर्वात भ्रष्ट खातं!

108

चिरीमिरी घेऊन प्रकरण दाबण्यात आले आहे, अशी बोंब सतत पोलीस खात्याबाबत केली जाते. मात्र पोलीस खात्यापेक्षा राज्याचे महसूल खातेच अधिक भ्रष्टाचारी असल्याचे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या वर्षभरातील कारवाईतून सिद्ध झाले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जानेवारी ते ७ डिसेंबर २०२१ केलेल्या कारवाईत महसूल विभागात सर्वाधिक सापळे लावण्यात आले असून त्या खालोखाल पोलीस दलात सापळे लावण्यात आले आहे.

खाजगी व्यक्तीसह २३७ जणांना अटक

राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून १ जानेवारी ते ७ डिसेंबर रोजी राज्यभरात केलेल्या कारवाईची आकडेवारी समोर आली आहे. या वर्षात ७१५ सापळे लावण्यात आलेले असून खाजगी व्यक्तीसह १००८ सरकारी कर्मचारी अधिकारी यांना अटक करण्यात आली होती. सर्वाधिक सापळे नाशिक, पुणे, आणि औरंगाबाद या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत. या सर्व सापळ्यात सर्वाधिक सापळे राज्याच्या महसूल विभागात लावण्यात आले असून १६५ गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या १६५ प्रकरणात लाचेची रक्कम ३४ लाख ८७ हजार ९३१ आहे. खाजगी व्यक्तीसह २३७ जणांना यामध्ये अटक करण्यात आलेली आहे.

(हेही वाचा- नांदगावरकर ‘मनसे’ सोडणार! चर्चेला पूर्ण विराम; म्हणाले…)

पोलीस विभागातील २४१ जणांना अटक

त्यापाठोपाठ पोलीस विभाग असून वर्षभरात राज्यभर १६३ गुन्हे पोलीस विभागाचे दाखल करण्यात आलेले असून २४१ जणांना अटक करण्यात आलेली आहे.  या १६३ प्रकरणात एकूण लाचेची रक्कम ५० लाख, २९ हजार १०० एवढी आहे.
महाराष्ट्र राज्य विद्यूत मंडळ ४९ सापळे लावण्यात आले असून ६५ जणांना अटक करण्यात आली आहे. लाचेची रक्कम ४ लाख २४ हजार एवढी आहे. महानगर पालिका ४७ गुन्हे दाखल ७१ जणांना अटक करण्यात आलेली असून लाचेची रक्कम ७० लाख २८ हजार पाचशे आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.