माथेरान-अमन लॉज शटल सेवा: २ महिन्यांत ५४.५९ लाखांचा महसूल जमा

७८,५७७ पेक्षा जास्त प्रवाशांचा प्रवास

141

माथेरान हे मुंबईतील नागरिकांसाठी सर्वात जवळचे आणि सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. अमन लॉज आणि माथेरान दरम्यानच्या प्रवाशांसाठी मध्य रेल्वेने शटल सेवेसह हे ठिकाण एक प्रमुख पर्यटन स्थळ म्हणून लोकप्रिय करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. मध्य रेल्वेने एप्रिल ते मे २०२२ या कालावधीत ७८,५७७ प्रवाशांनी प्रवास केला आणि ९,११५ पॅकेजेसची वाहतूक केली, तर अमन लॉज आणि माथेरान दरम्यान एप्रिल ते मे २०२१ या कालावधीत ५,७३९ प्रवाशांची आणि २,९३१ पॅकेजेसची वाहतूक केली गेली.

दोन महिन्यात ५४.५९ लाखांचा महसूल जमा

पर्यटकांना आरामदायी प्रवास देण्यासोबतच, या सेवा स्वस्त आणि जलद साहित्याची वाहतूक करण्यासही मदत करतात. यामुळे एप्रिल ते मे २०२२ या कालावधीत रु. ५४.५९ लाखांचा महसूल मिळाला आहे. यामध्ये रु.५३.८ लाख प्रवासी महसूल आणि रु. ७४,११७/- च्या पार्सल महसुलाचा समावेश आहे. त्या तुलनेत एप्रिल – मे २०२१ या कालावधीतील रु. २.९४ लाख महसुलात रु. २.७० लाख प्रवासी महसूल तर पार्सलमधून रु. २४४७५/- महसूल प्राप्त झाला होता. हे आकडे या पर्यटन स्थळी येणाऱ्या प्रवाशांना सुरक्षित आणि आरामदायी प्रवास देण्यासाठी रेल्वेची महत्त्वाची भूमिका दर्शवतात.

(हेही वाचा – ‘माथेरानच्या राणी’ला पर्यटकांची पसंती!)

अविस्मरणीय राईडसह निसर्ग पाहण्याचा थरार

मध्य रेल्वेने हे ठिकाण केवळ प्रमुख पर्यटन स्थळ म्हणून नव्हे तर निसर्गाच्या जवळ जाणारे ठिकाण म्हणूनही लोकप्रिय केले आहे. हा प्रवास टॉय ट्रेनमधील अविस्मरणीय राईडसह निसर्ग जवळून पाहण्याचा थरार प्रदान करते आणि त्यामुळे माथेरानच्या नैसर्गिक वातावरणातील शांततेत मग्न होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.