गेल्या काही दिवसांपासून राज्यात पुन्हा एकदा कोरोनाबाधितांचा आकडा वाढतांना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारने राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून मिनी लॉकडाऊनची घोषणा शनिवारी केली. राज्य सरकारच्या त्या नियमावली नुसार सोमवारपासून जिम, ब्युटी पार्लर्स बंद करण्याचा आदेश दिला होता. मात्र सुधारीत नवीन नियमावलीनुसार जिम आणि ब्युटीपार्लरवरील निर्बंध मागे घेण्यात आले आहेत. जुन्या आदेशात दुरुस्ती करून सुधारित आदेश जारी केला आहे. या नव्या सुधारित आदेशात जिम, ब्युटी पार्लर्स मिनी लॉकडाऊन दरम्यान सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.
Revised guidelines for Beauty Salons & Gyms pic.twitter.com/lzSQZUJlXg
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) January 9, 2022
- जीम आणि ब्युटी पार्लर 50 टक्के क्षमतेने सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
- जीम आणि ब्युटी पार्लरध्ये लसीचे दोन डोस झालेल्या कर्मचारी आणि व्यक्तींना प्रवेश दिला जाणार आहेत.
- ही परवानगी देताना काही नवीन नियमांसह मास्क वापरणे गरजेचे असणार आहे.
(हेही वाचा – अखेर निर्बंध लागलेच! रात्री संचारबंदी! दिवसा काय असणार बंद? जाणून घ्या…)
काही नियम घालून अखेर परवानगी
स्वीमिंग पूल, जिम, स्पा, वेलनेस सेंटर्स आणि ब्यूटी सलून्स बंद राहतील, असे आधीच्या आदेशात म्हटले होते. मात्र, या निर्णयाला मोठा विरोध करण्यात आला होता. जिम, ब्युटी पार्लर्स पूर्णतः बंद करण्याचे आदेश आल्यानंतर मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली जात होती. जाहीर केलेल्या नवीन नियमावलीमध्ये थोडा बदल करून ब्युटी पार्लर सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र सलून व ब्युटी पार्लर असोसिएशनकडून करण्यात आली होती. राज्य सरकारने जाहीर केलेल्या नवीन नियमावलीमध्ये सलून व्यावसाय सुरू ठेवण्यास परवानगी दिली होती पण जीम आणि ब्युटी पार्लरला परवानगी देण्यात आली नव्हती. त्यामुळे विरोध होत होता. अखेर काही नियम घालून परवानगी देण्यात आली आहे.
मिनी लॉकडाऊनदरम्यान काय सुरू?
- खासगी कार्यालये ५० टक्के क्षमतेने सुरू राहणार
- शॉपिंग मॉल्स ५० टक्के क्षमतेने सुरू राहणार
- नाट्यगृह आणि चित्रपटगृह ५० टक्के क्षमतेने सुरू राहणार
- दोन्ही डोस घेतलेल्यांना सार्वजनिक बसने वाहतूक करण्यास मुभा
- सलून ५० टक्के क्षमतेने सुरू करण्यास मुभा