श्रीमंत देश हवामान बदलासाठी जबाबदार; भरावा लागणार दंड

इजिप्तमधील संयुक्त राष्ट्रांच्या हवामान शिखर परिषदेमध्ये जमलेल्या 200 देशांमध्ये रविवारी ऐतिहासिक करार झाला. यामध्ये श्रीमंत देशांना हवामान बदलासाठी जबाबदार धरण्यात आले आहे. 14 दिवस झालेल्या जोरदार चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. या अंतर्गत श्रीमंत देशांना एक फंड तयार करावा लागणार असून, यामुळे गरीब देशांना हवामान बदलाचा सामना करण्यासाठी भरपाई मिळेल. हा गरीब देशांचा मोठा विजय मानला जात आहे.

अनेक श्रीमंत देश इतर मुद्द्यांवरुन निधीच्या मुद्द्याला दाबण्याचा प्रयत्न करत होते. भारत, ब्राझीलसह आशिया, आफ्रिका आणि अनेक देशांनी हा निधी मंजूर करण्याची जोरदार मागणी लावून धरली. गरीब आणि विकसनशील देशांनी मिळून श्रीमंत देशांवर दबाव आणला आहे.

भारताचे म्हणणे काय?

केंद्रीय पर्यावरणमंत्री भूपेंद्र यादव म्हणाले की, जगाने यासाठी खूप प्रतीक्षा केली. हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी करण्याच्या जबाबदा-या अल्पभूधारक शेतक-यांवर लादू नये.

काय होणार ?

  • निधीसाठी समिती स्थापन करण्यात येणार आहे. यात 24 देशांचे प्रतिनिधी असतील.
  • हा निधी कसा वापरावा यावर वर्षभर चर्चा होईल
  • कोणत्या देशाला किती आणि कोणत्या आधारावर नुकसान भरपाई मिळणार हे ठरवले जाईल.
  • कोणकोणते देश नुकसान भरपाई देणार हेही समिती ठरवेल.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here