ऋषी सुनक (Rishi Sunak) हे हिंदू धर्म पाळणारे आहेत. जी-20 शिखर परिषदेसाठी नुकत्याच झालेल्या भारत दौऱ्यादरम्यान या जोडप्याने नवी दिल्लीतील अक्षरधाम मंदिरात पूजा केली.
त्यांनतर आता त्यांनी थेट ब्रिटनच्या (Rishi Sunak) सरकारी निवासस्थानी आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत दिवाळी साजरी केली. याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
अधिक माहितीनुसार, ब्रिटीश पंतप्रधान ऋषी सुनक (Rishi Sunak) यांनी रविवारी (१२ नोव्हेंबर) लंडनच्या 10 डाउनिंग स्ट्रीटवर पत्नी अक्षता मूर्ती आणि मुलींसोबत दिवाळी साजरी केली. सुनक यांनी इन्स्टाग्रामवर या सोहळ्याचे फोटो शेअर केले, ज्यात कुटुंब दिवे पेटवताना दिसत आहे. भारतीय संस्कृतीला आदरांजली म्हणून सुतक यांच्या पत्नीने शाही निळी साडी परिधान केली होती. तसेच त्यांच्या मुली कृष्णा आणि अनुष्का यांनीही घरी दिवाळी साजरी करण्यासाठी पारंपारिक पोशाख परिधान केले होते.
View this post on Instagram
(हेही वाचा – Ayodhya Diwali 2023 : दिपोत्सवाचे फोटो शेअर करत पंतप्रधानांनी दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा!)
‘क्रमांक 10 च्या पायऱ्यांवर माझ्या कुटुंबासमवेत दिवाळी साजरी करणे हा माझ्यासाठी विशेष क्षण आहे. ब्रिटनमध्ये आणि जगभरात दिवाळी साजरी करणाऱ्या सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा” असे पंतप्रधान सुनक (Rishi Sunak) यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर फोटो शेअर करतांना लिहिले.
तत्पूर्वी, सुनक यांनी 10 डाउनिंग स्ट्रीटवर (Rishi Sunak) भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांची भेट घेतली. तिथे जयशंकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वतीने दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. जयशंकर आणि त्यांची पत्नी यांनी ब्रिटनच्या पंतप्रधानांना श्री गणेशाची मूर्ती आणि भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने स्वाक्षरी केलेली क्रिकेट बॅट भेट म्ह्णून दिली.
ब्रिटनच्या पंतप्रधानांच्या अधिकृत हँडलने एक्स वर त्यांच्या भेटीची छायाचित्रे शेअर केली आणि लिहिले, “पंतप्रधान @RishiSunak यांनी आज संध्याकाळी @DrSJaishankar यांचे डाउनिंग स्ट्रीटवर स्वागत केले. तसेच जगभरातील भारतीय समुदायांनी #Diwali उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. (Rishi Sunak)
The Prime Minister @RishiSunak welcomed @DrSJaishankar to Downing Street this evening.
Together they expressed their very best wishes as Indian communities around the world begin #Diwali celebrations.
🇬🇧🇮🇳 pic.twitter.com/gjCxQ0vr8d
— UK Prime Minister (@10DowningStreet) November 12, 2023
हेही पहा –
Join Our WhatsApp Community