ब्रिटनमध्ये मोठा इतिहास घडला आहे. भारतीय वंशाचे ऋषी सुनक हे आता ब्रिटनच्या पंतप्रधानपदी विराजमान होणार आहेत. सुनक यांनी पेनी मोरडॉन्ट यांना पराभूत करत अखेर विजय मिळवला आहे. मिळालेल्या माहितीनुसार ऋषी सुनक हे 28 ऑक्टोबरला पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. ते भारतीय वंशाचे ब्रिटनमधील पहिले पंतप्रधान ठरले आहेत.
सुनक यांना तब्बल 180 पेक्षा जास्त खासदारांचे समर्थन मिळाले आहे. पण ऋषी सुनक नेमके आहेत तरी कोण?
(हेही वाचाः ब्रिटनमध्ये घडला इतिहास, भारतीय वंशाची व्यक्ती होणार पंतप्रधान)
कोण आहेत सुनक?
सुनक यांचे आई-वडील हे मुळचे भारतीय. ऋषी यांचा जन्म 1980 रोजी इंग्लंडच्या साऊदम्पटनमध्ये झाला. त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठातून राजकारण आणि अर्थशास्त्राचे शिक्षण घेतले आहे. स्टॅनफोर्ड विद्यापीठातून त्यांनी एमबीएची पदवी घेतली आहे. तसेच ते इन्फोसिसच्या नारायण मूर्तींचे जावई आहेत. 2019 मध्ये त्यांना ब्रिटनमध्ये मंत्रीपद मिळाले होते.
भारत-ब्रिटन संबंधांवर काय परिणाम होणार?
ब्रिटनचे माजी पंतप्रधान भारत आणि ब्रिटनच्या संबंधांची जी काही पायाभरणी केली आहे ती सुनक यांना पुढे न्यायची आहे. ब्रिटनच्या दृष्टीने भारताचे जागतिक राजकारणात सुद्धा मोठे स्थान आहे. त्यामुळे जागतिक पातळीवर ब्रिटनला भारताची मोठी गरज आहे. त्यामुळे हे संबंध कायम ठेवण्याची जबाबदारी आता सुनक यांच्या खांद्यावर असणार आहे.
Join Our WhatsApp Community