मुंबईकरांनो टॅक्सीने प्रवास करताय? तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची

120

पेट्रोल आणि डिझेलपाठोपाठ सीएनजीच्या सातत्याने वाढणाऱ्या किमतींमुळे ऑटो-रिक्षा चालकांना आपलं घर चालवणे कठीण होत आहे. त्यामुळे सातत्याने सीएनजीच्या किमतीत वाढ होत असल्याने आता मुंबईकरांचा टॅक्सी प्रवास महाग होण्याची शक्यता असल्याचे सांगितले आहे. मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाची लवकरच यासंदर्भात बैठक होणार असून, भाडेवाढीचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

(हेही वाचा – मुंबईकरांची ‘कूल’ लोकल प्रवासाला पसंती)

… तर टॅक्सी भाडे वाढणार

समोर आलेल्या माहितीनुसार, १ मार्च २०२१ पासून सीएनजीच्या किमती ३५ टक्क्यांनी वाढल्या आहेत. तर गेल्या सात महिन्यांत सीएनजीची किंमत ५१ रुपयांवरून ६७ रुपयांवर पोहोचली आहे. याआधी टॅक्सीचे भाडे १ मार्च २०२१ पासून २२ रुपयांवरून २५ रुपये करण्यात आले होते. ही शेवटची भाड्यातील सुधारणा झाल्यानंतर सीएनजीच्या किमतीत ३५ टक्क्यांहून अधिक वाढ करण्यात आली आहे. खटुआ समितीच्या अहवालानुसार, सीएनजीची किंमत २५ टक्क्यांच्या पुढे गेल्यास टॅक्सी भाडे सुधारणे आवश्यक आहे.

(हेही वाचा – मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल)

सीएनजी दरवाढीमुळे टॅक्सी चालक हैरान

कोरोना महामारीदरम्यान, सर्वसामान्य गरीब टॅक्सी चालक, ज्यांच्या कमाईला लॉकडाऊनमध्ये फटका बसला आहे, त्यांना या सीएनजी दरवाढीमुळे आणखी नुकसान सहन करावे लागत आहे. किमान टॅक्सी भाडे २५ रुपयांवरून ३० रुपये पर्यंत सुधारित करण्याची विनंती करण्यात आल्याचे मुंबई टॅक्सीमेन्स युनियनकडून सांगण्यात येत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.