रत्नागिरीतील नद्या धोक्याच्या पातळीवर

106

सोमवारी दिवसभर पावसाने दक्षिण कोकणात धुमाकूळ घातला आहे. काही ठिकाणी 200 मिमी पावसाची नोंद झाली आहे. रत्नागिरीत रात्रीही काही तास पावसाच्या मुसळधार सरी कोसळतील असा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने दिला आहे.

(हेही वाचा – कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात 8 जुलैपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता)

खेड तालुक्यातील जगबुडीनदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. जगबुडी नदीची धोक्याची पातळी 7 मीटर आहे, नदीपात्रातील पाणी आता 8 मीटरपर्यंत पोहोचले आहे. जगबुडी खालोखाल राजापूर तालुक्यातील कादवली नदीने इशाऱ्याची पातळी पार केली आहे. कादवली नदी सध्या 5.90 मीटरपर्यंत वाहत आहे. त्यासह चिपळूण तालुक्यातील वाशिष्ठी नदी, संगमेश्वर तालुक्यातील शास्त्री नदी आणि लांजा तालुक्यातील काजळी नदीही धोक्याची पातळी ओलांडतील, अशी भीती व्यक्त केली जात आहे .

12

तर वैभववाडी तालुक्यात दिवसभर मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे वैभववाडीत रेल्वे स्टेशन रुळावर पाणी भरले. यामुळे रेल्वे वाहतूक संथ गतीने सुरू होती. वैभववाडी–तळेरे मार्गावर ठिकठिकाणी पाणी रस्त्यावरून वाहत होते. त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती. त्याचबरोबर उंबर्डे – वैभववाडी मार्ग पाण्याखाली गेल्याने वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. पावसाचा फटका करुळ घाटमार्गाला देखील बसला. करुळ घाटात ठिकठिकाणी दरडी कोसळल्या आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.