ऑलिंपिक विजेत्या नीरज चोप्राला मलिष्काची झप्पी!

नीरज चोप्राची मुलाखत घेताना मलिष्काने नीरजकडे अशी काही विचित्र मागणी केली कि मलिष्काचा हा अविष्कार नेटकऱ्यांना अजिबात आवडला नाही आणि त्यांनी थेट तिला तिची जागा दाखवायला सुरुवात केली. 

92

ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा याने भालाफेकमध्ये सुवर्ण कामगिरी केल्यानंतर त्याच्यावर देशभरातून सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे. सोबतच त्याच्या मुलाखतीही घेतल्या जात आहेत. अशीच एक मुलाखत सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. रेडिओ जगतातील ‘रेड एफएम’ वरील प्रसिद्ध रेडिओ जॉकी (RJ) मलिष्का हिने गोल्डन बॉयची डिजिटल माध्यमातून मुलाखत घेतल्याचा हा व्हिडिओ आहे.

मलिष्काचा अविष्कार नाही रुचला नेटकऱ्यांना!

या व्हरच्यूअल मुलखतीच्या सुरुवातीला मालिष्का आणि तिच्या टीम कडून ‘उडें जब जब जुल्फे तेरी… ‘ या १९५७ च्या ‘नया दौर’ या चित्रपटातील गाण्यावर नाचून नीरज चोप्राचे विशेष स्वागत करताना पाहायला मिळेल. या मुलाखतीमध्येच मलिष्का ही नीरजला ‘आम्ही तुला जास्तच सतावले तर नाही ना…’ असाही लाडीक प्रश्न केला. मलिष्का याच सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्ममधून प्रसिद्ध झाली. कधी मुंबईतील खड्ड्यांवर टीका करणारे गाणे बनवून ते सोशल मीडियात व्हायरल कर, तर कुठे मुंबई आणि महाराष्ट्राच्या राजकारणावर सोशल मीडियातून टीकाटिपण्णी कर, असे प्रकार करत मलिष्काने सोशल मीडियातून बरीच प्रसिद्धी मिळवली. मात्र या तिच्या अशा प्रयत्नांत कधी तरी ती नेटकऱ्यांची ‘शिकार’ होईल, अशीही शक्यता होती आणि ते तसेच झाले. नीरज चोप्राच्या मुलाखतीत तिने नीरजकडे अशी काही विचित्र मागणी केली कि मलिष्काचा हा अविष्कार नेटकऱ्यांना अजिबात आवडला नाही आणि त्यांनी थेट तिला तिची जागा दाखवायला सुरुवात केली.

https://twitter.com/Aasuuud/status/1428944232828620803?s=20

गोल्डन बॅायने विनम्रतेने दिले चोख उत्तर!

ही मुलाखत व्हायरल होण्याचे कारण म्हणजे यात गोल्डन बॉयने मलिष्काला आपल्या वर्तनातून दिलेले चोख उत्तर होय. मलिष्का नीरजला एक ‘जादू की झप्पी’ देतोस का, अशी विचारणा करते, तेव्हा तो विनम्रतेने ‘दूर से ही नमस्ते’ म्हणून तिला नमस्कार करतो. यानंतर नीरजचे त्याच्या या सभ्येतेमुळे सर्वत्र कौतुक होत असून, आरजे मलिष्काला मात्र तिच्या या अनप्रोफेशनल वर्तणुकीसाठी सोशल मीडियावर चांगलीच ट्रॉल होत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.