कर्नाटकात भीषण अपघात, लॉरी-बसच्या धडकेत 7 ठार, 26 जखमी

82

कर्नाटकमध्ये एक भीषण अपघाताची घटना घडली आहे. हुबळी धारवाडच्या तरीहाळा बायपासवर भीषण अपघात झाला. लॉरी आणि खासगी बसची जोरदार धडक झाल्याने या अपघातात ७ जण जागीच ठार झाले तर २६ जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातातील जखमींना उपचारासाठी हुबळीच्या किम्स रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मिळतेय. तर या अपघातातील मृतांमध्ये कर्नाटकातील दोघांचा समावेश असून ६ जण कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्यातील होते.

(हेही वाचा – आता WhatsApp वरून एक्सेस करता येणार DigiLocker!)

सोमवारी रात्रीच्या सुमारास हा अपघात झाला. कोल्हापूरहून बंगळुरूच्या दिशेने ही बस जात असताना ही बस जात असताना ही बस जात असताना भीषण दुर्घटना घडली. ओव्हरटेक करण्याच्या नादात हा अपघात घडला असून एका ट्रॅक्टरला भरधाव वेगाने जाणारी खासगी बस ओव्हरटेक करत होती. त्यावेळी हा अपघात घडल्याची माहिती मिळत आहे. पोलिसांनी या अपघात घडल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

या घटनेमुळे हुबळी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. हा अपघात इतका भीषण झाला की, बसचा समोरील भागाचा पूर्णत: चक्काचूर झाला आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच धारवाडमध्येही अपघाताची घटना घडली होती. यामध्ये ७ जण ठार झाले होते. ही घटना ताजी असताना पुन्हा या अपघाताच्या धक्कादायक घटनेनं हुबळीकर हळहळ व्यक्त करत आहे. लग्नकार्य उरकुन परतत असताना धारवाडमधील अपघतात सात जणं ठार झाली आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.