समृद्धी महामार्गावरील अपघातांचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत आहे. समृद्धी महामार्ग मृत्यूचा सापळा बनतोय का असे प्रश्न आता उपस्थित होताना दिसत आहे. रविवारी सकाळी वेगवान कार उलटल्यामुळे महामार्गावर भीषण अपघात झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
( हेही वाचा : मुंबईचे तापमान ३८ अंशावर! मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात पुन्हा पाऊस? काय आहे हवामान विभागाचा अंदाज )
रविवारी सकाळी झालेल्या अपघातामध्ये ५ जणांचा मृत्यू झाला असून ७ जण जखमी झाले आहेत. वेगवान कार उलटल्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. ही गाडी औरंगाबादहून शेगावच्या दिशेने जाताना हा अपघात झाला. या गाडीमध्ये एकूण ९ प्रवासी होते. मेहकरजवळ सिलनी पिसा गावातील नागपूर कॉरिडॉरजवळ हा भीषण अपघात झाला.
यामध्ये २ मुले आणि ३ महिलांचा मृत्यू झाला असून इतर ७ जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.