वाहनचालकांसाठी काळरात्र! राज्यभरात सायंकाळी ६ ते ९ वेळात सर्वाधिक अपघात

84

राज्यात रस्ते अपघातात गेल्या ११ महिन्यात ११ हजारांहून अधिकांनी आपला जीव गमावला आहे. गेल्या ११ महिन्यांत सर्वाधिक मुंबईत २ हजार ६०४ अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा राज्यातील रस्ते अपघाताची संख्या वाढली आहे. यामध्ये विषेश म्हणजे होणाऱ्या अपघाताच्या वेळा ठरल्या आहेत. सायंकाळी ६ ते रात्री ९ वाजेदरम्यान सर्वाधिक रस्ते अपघात होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे राज्यातील वाहन चालकांसाठी ही काळरात्र ठरत असल्याचे म्हटले जात आहे. ही माहिती राज्याच्या महामार्ग पोलिसांच्या अभ्यासपूर्ण अहवालावरून समोर आली आहे.

सर्वाधिक अपघात या महिन्यात

यामध्ये सर्वाधिक अपघात जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आणि नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात झाले आहे. गेल्या वर्षभरापासून राज्यात कोरोना महामारीने सर्वांचे जगणं कठीण केले असताना कोरोना महामारीत गेलेले वर्ष सर्वाधिक अपघातग्रस्त ठरल्याचे समोर आले आहे. राज्यात ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागात सर्वाधिक अपघात व मृत्यू सायंकाळी ६ ते रात्री ९ या दरम्यान झाले आहेत. गेल्या वर्षी या तीन तासात एकूण ४ हजार ६०७ अपघातात ५ हजार ६९९ अपघातग्रस्त झाले आहेत. त्यापैकी २ हजार ४१ जीवघेण्या अपघातात २ हजार १९० लोकांचा मृत्यू झाला आहे.

(हेही वाचा – देशात ३३ लाखांहून अधिक कुपोषित बालकं! महाराष्ट्रासह बिहार उच्च स्थानी)

समोर आलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षभरात जानेवारी, फेब्रुवारी आणि नोव्हेंबर, डिसेंबर या चार महिन्यात सर्वाधिक अपघात झाले आहे. यामध्ये दुपारी ३ ते ६ तर सायंकाळी ६ ते रात्री ९ वाजेदरम्यान ग्रामीण आणि शहरी भागात सर्वाधिक अपघात झाले आहे. ३ ते ६ वाजेदरम्यान ४ हजार १६७ अपघात झाले आहे. त्यामध्ये १ हजार ६९८ जीवघेण्या अपघातांमध्ये १ हजार ८२९ मृत्यू झाले आहेत. तर सायंकाळी ६ ते रात्री ९ वाजेदरम्यानही सर्वाधिक अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.