मुंबईतील अनेक रस्त्यांची कामे हाती घेण्यात येत असून यामध्ये माहिम, दादर आणि धारावी या जी उत्तर विभागातील तब्बल १८ रस्त्यांची कामे निश्चित करण्यात आली आहे. या रस्ते कामांसाठी कंत्राटदाराची निवड करण्यात आली आहे. या रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. यासाठी तब्बल ५८ कोटी रुपये खर्च केले जाणार आहे.
दादर, माहिम आणि धारावीतील अनेक रस्ते खराब झालेले असून त्या रस्त्यांची सुधारणा सिमेंट काँक्रिटीकरणाद्वारे करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतच्या कामांच्या निविदा पूर्ण झाल्या आहेत. यासर्व रस्ते कामांच्या पात्र कंपन्यांची निश्चित करण्यात आल्यानंतर स्थायी समितीच्या बैठकीपुढे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. या रस्त्यांच्या विकास व्हावा यासाठी शिवसेना नगरसेवक मिलिंद वैद्य, भाजप नगरसेविका शीतल गंभीर, सभागृह नेत्या विशाखा राऊत, शिवसेना नगरसेविका प्रीती पाटणकर आणि धारावीतील काँग्रेस नगरसेविका गंगा माने आदींच्या प्रभागातील हे सर्व रस्ते आहेत.
(हेही वाचा – लग्न समारंभासह इतर कार्यक्रम महापालिकेच्या रडारवर)
दादर
- रानडे रोड, दादर
- एच एम पाटील सेड मार्ग
- अनंत पाटील मार्ग
- बी. डब्लु .पठारे रोड-मार्ग
- गॅरेज गल्ली
- राम मारुती मार्ग
- पी एल काळे सेड-गुरुजी मार्ग
- सूर्यवंशी क्षत्रीय सभागृह मार्ग
माहिम
- बाल गोविंद दास मार्ग,
- भगत गल्ली,
- माहीम मच्छिमार कॉलनी रोड,
- सोनवाला अग्यारी रोड,
- बेस्ट क्वाटर्स एन्ट्री रोड,
- वृंदावन सोसायटी रोड
धारावी
- पी एम जी पी कॉलनी मेन रोड,
- पी एम जी पी कॉलनी क्रॉस रोड नं. १,
- पी एम जी पी कॉलनी क्रॉस रोड नं. २,
- पी एम जी पी कॉलनी क्रॉस रोड नं.३