व्यवसाय करण्यासाठी आपली कार विकली आणि झाला कोट्यधीश

156
व्यवसाय करण्यासाठी आपली कार विकली आणि झाला कोट्यधीश
व्यवसाय करण्यासाठी आपली कार विकली आणि झाला कोट्यधीश

मुलं शाळेत हुशार मुलांच्या गणतीत येत नसली तरीही काही मुलं तरीसुद्धा काही मुलं अशी असतात की, ज्यांना आपल्या भविष्यात काय करायचं आहे हे पक्कं माहिती असते. खरंतर याची सुरुवात लहानपणापासून झालेली असते. शाळेत असताना अगदी सगळ्या विषयांत मुलं हुशार नसली तरी एखादा विषय मुलांच्या आवडीचा असतोच आणि भविष्यात त्या विषयाला धरून किंवा त्याविषयीच्याच एखाद्या क्षेत्रात मुलं आपली कर्तबगारी सिद्ध करून दाखवतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका मुलाविषयी सांगणार आहोत.

या मुलाने आपलं शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आपल्याला भविष्यात जे काम करायचे आहे ते कसे पूर्णत्वास नेता येईल यासाठी दोनशे पाणी योजना आखली आणि तो आपल्या कामाला लागला. शाळेत शिकवला जाणारा तंत्रज्ञान हा विषय त्याच्या प्रचंड आवडीचा होता. पुढे या मुलाने तंत्रज्ञान या विषयाची पदवी संपादन केली. एवढे केल्यानंतर आपला बिझनेस सुरू करण्यासाठी त्याने आपल्या घरच्या गॅरेजची जागा निवडली. आता प्रश्न होता भांडवल कुठून आणायचं? पण तोही प्रश्न त्याने सोडवला. भांडवल उभे करण्यासाठी त्याला आपल्या पालकांची चारचाकी गाडी विकणे गरजेचे होते. त्या मुलाला याचे खूप दुःख वाटत होते पण त्याच्या पालकांचा त्याला पाठिंबा होता. त्याने गाडी १००० पौंड एवढ्या किमतीला विकून आपल्या बिझनेससाठी भांडवल उभे केले आणि आपला आयटी सोल्यूशनचा बिझनेस सुरू केला. आज तो मुलगा कोट्यवधी रुपयांचा मालक आहे.

(हेही वाचा – चांद्रयान-३ चे यशस्वी उड्डाण; ‘इतक्या’ दिवसांनी लँडर उतरणार चंद्रावर)

या माणसाचं नाव आहे रॉब डेन्स. आजच्या घडीला हा माणूस कोट्यवधी रुपयांचा मालक आहे. रॉबने आपलं शिक्षण पूर्ण केल्यानंतर आयटी कन्सल्टन्सीचा बिझनेस सुरू केला. आता रॉब चाळीस वर्षांचा असून दोन मुलांचा बाप आहे. तो आयटी कन्सल्टन्सी कंपनीचा सीईओ असून वर्षाला दहा मिलियन पौंड म्हणजेच जवळपास एकशे तीन कोटी रुपये कमावतो. त्याने जेव्हा आपल्या कंपनीची सुरुवात केली होती तेव्हा त्याच्याकडे तीस कर्मचारी कामाला होते. आता त्याच्या कर्मचाऱ्यांची संख्या शंभरावर जाऊन पोहोचली आहे. रॉबने सुरुवातीला वेगवेगळ्या कंपन्यांना आयटी सपोर्ट देण्याचे काम सुरू केले. या कामासाठी तो प्रत्येक दिवसाची फी न घेता महिन्याचे पैसे घेऊ लागला. त्यात कंपन्यांचाही फायदा होत असल्याने त्याला काम देणाऱ्या कंपन्यांची संख्या वाढायला लागली. अशाप्रकारे त्याने हळूहळू आपला बिझनेस वाढवायला सुरुवात केली.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.