मुंबईतील दहिसर भागात स्टेट बँक ऑफ इंडियाच्या बँकेत भर दिवसा दरोडा टाकण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दरोडा टाकण्यासाठी आलेल्या दोन हल्लेखोरांनी बँकेत दिवसाढवळ्या गोळीबार केला आहे. या हल्ल्यात बँकेच्या एका कर्मचाऱ्याचा दुर्देवी मृत्यू झाला असल्याचे सांगितले जात आहे.
असा घडला प्रकार
दहिसर पश्चिम येथे असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारासही घटना घडली. दोन दरोडेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवून बँकेत प्रवेश केला. मिळालेल्या माहितीनुसार, पैसे लुटण्यासाठी कर्मचाऱ्यांवर दबाव टाकत दरोडेखोरांनी कर्मचाऱ्यांवर गोळीबार केला. यामध्ये एक कर्मचारी जखमी झाला आहे. या कर्मचाऱ्याचे वय साधारण 25 ते 28 दरम्यान असल्याचे सांगितले जात आहे. दरोडेखोर 2 लाख 50 हजार रुपयांची रोकड घेऊन फरार झाले आहे. पोलिसांच्या 8 टीम आरोपीसचा शोध घेत आहेत.
(हेही वाचा – ठाकरे सरकारमधील आरोग्यमंत्री राजेश टोपे ‘घोटाळेरत्न’!)
ही घटना घडल्यानंतर या गोळीबारात जखमी झालेल्या कर्मचाऱ्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र या कर्मचाऱ्याचा उपचारादरम्यान, मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच दहिसर पोलीस या शाखेत दाखल होत बँकेची पाहणी केली. या संपूर्ण प्रकरणानंतर दरोडेखोरांना पकडण्यासाठी नाकाबंदी करण्यात आली असून पोलिसांकडून या प्रकरणी अधिक तपास सुरू करण्यात आला आहे.