कोरोना महामारीनंतर अनेक लोकांवर उपासमारीची वेळ आल्यामुळे चोरी, घरफोडी, दरोडा या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. पुण्यातील आळेफाटा येथे इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानावर सोमवारी रात्री दरोडा पडला. चार अज्ञात दरोडेखोरांनी पिस्तुलाचा धाक दाखवून इलेक्ट्रॉनिक्स दुकानातील रोख रक्कम चोरून नेली. ही घटना दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
आळेफाटा येथे अविनाश पटाडे यांचे साई इलेक्ट्रॉनिक्स हे दुकान आहे. दरोड्याची घटना सोमवारी रात्री साडेदहा वाजता घडली, ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडिओ आता समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बोरी बुद्रुक येथे असलेल्या साई इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानात सोमवारी रात्री चार अज्ञात दरोडेखोरांनी प्रवेश करुन अविनाश यांना बंदुकीचा धाक दाखविला आणि रोख रक्कम चोरून नेली.
( हेही वाचा : संसार थाटण्यासाठी तिने केले असे, पण तुरूंगात रंगवतेय संसाराची स्वप्ने )
सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
बंदुकीचा धाक दाखवत दरोडेखोरांनी दुकानातील रोख रक्कम चोरून नेली असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. ही घटना दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. तालुक्यात वारंवार अशा घडत असल्यामुळे तालुक्यात कायदा व सुव्यवस्थेचा तसेच नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
Join Our WhatsApp Community