शहापुरात ‘असा’ पडला दरोडा! ४० लाखांची कॉपर वायर गेली चोरली

114

ठाणे जिल्ह्यातील शहापूर मधील लाहे गाव या ठिकाणी असलेल्या एका इंजिनियरिंग वर्कशॉपमध्ये १० ते १२ जणांच्या टोळीने दरोडा टाकत कामगारांना एका खोलीत बांधून ठेवून या वर्कशॉपमधील ४० लाख रुपये किमतीची कॉपर वायरसह पोबारा केला आहे. या दरोड्याच्या घटनेमुळे शहापूर तालुका हादरला असून इतर व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याप्रकरणी शहापूर तालुका पोलिसांनी दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे.

सीसीटीव्ही आणि डिव्हीआर काढून पोबारा

ठाणे शहरात राहणारे जयवंत थोरात यांचा शहापूर तालुक्यातील लाहे गाव या ठिकाणी ‘व्हिजन विद्युत इंजिनिअर्स प्रा.लि’ हे वर्कशॉप आहे. हा वर्कशॉपमध्ये दोन शिफ्टमध्ये काम चालते. प्रजासत्ताक दिनाच्या आदल्या दिवसाच्या रात्री या वर्कशॉप मध्ये ८ ते १० कामगार काम करीत होते, त्यावेळी अचानक वर्कशॉपच्या बाहेरील गेटचा आवाज होऊ लागल्यामुळे वर्कशॉपमधील कामगार अनिल परमार हा गेटवर आला, त्याने गेट उघडताच माकडटोपी आणि स्वेटर घातलेले दोघे तिघे वर्कशॉपमध्ये आले व त्यांनी परमार याला एका खोलीत बंद केले व इतर ८ ते दहा कर्मचारी यांना शस्त्राचा धाक दाखवून सर्वांना एका खोलीत बंद करून त्याचे हात-पाय, तोंड बांधून त्यांच्याजवळील मोबाईल फोन काढून घेत वर्कशॉपमधील ४० लाख रुपये किमतीचे कॉपर वायरचे रोल चोरी करून तसेच वर्कशॉपमधील सीसीटीव्ही आणि डिव्हीआर काढून पोबारा केला.

(हेही वाचा पश्‍चिम द्रुतगती महामार्ग व जोगेश्‍वरी-विक्रोळी जोडरस्ता जंक्शन जवळ भुयारी मार्ग बांधा!)

१० ते १२ दरोडेखोरांविरुद्ध दरोड्याचा 

कामगारांनी कशीबशी स्वतःची सुटका करून मालकाला फोन करून घडलेला सर्व प्रकार सांगितला. मालकांनी सकाळी वर्कशॉपमध्ये धाव घेतली आणि पोलिसांना कळवले. शहापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा करून १० ते १२ दरोडेखोरांविरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.