पंजाबच्या मोहालीत इंटेलिजन्स विभागाच्या इमारतीतच स्फोट

90

मोहालीत इंटेलिजन्स विभागाच्या इमारतीत स्फोट झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. इमारतीच्या दुसऱ्या माळ्यावर रॉकेटसारखी वस्तू पडल्याची चर्चा आहे. स्फोटामुळे बिल्डींगमधील काचा तुटल्या आहेत.

जीवित हानी नाही

या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले आहे. प्राथमिक माहितीनुसार रात्री 10 वाजताच्या सुमारास रॉकेट सदृश वस्तू इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर आदळली आणि मोठा स्फोट झाला आहे. इमारतीच्या काही काचा तुटल्या आहेत.या घटनेमागचे नेमके कारण समोर आलेले नाही. पोलीस याचा कसून तपास सुरू आहे. हा हल्ला कसा झाला याचा तपास पोलीस करत आहे. मात्र कोणतीही जीवितहानी हल्ल्यात झालेली नाही. पोलिसांनी संपू्र्ण परिसर सील केलेला आहे. फॉरेन्सिकची टीम देखील घटनास्थळी झाली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.