रॉजर स्मिथ (Roger Smith) म्हणजे प्रचंड हॅंडसम आणि जबरदस्त अभिनेता. १९५६ ते १९७७ हा काळ त्याने गाजवलेला आहे. म्हणजे जवळजवळ दोन दशकं त्याने रसिकांचे मनोरंजन केले. रॉजर लॅव्हर्न स्मिथ हा एक अमेरिकन टेलिव्हिजन आणि चित्रपट अभिनेता, निर्माता आणि पटकथा लेखक होता. त्याने टेलिव्हिजन डिटेक्टिव्ह मालिका ७७ सनसेट स्ट्रिप आणि मिस्टर रॉबर्ट्स या कॉमेडी शोमध्ये काम केले.
सहाव्या वर्षी स्टेज स्कूलमध्ये दाखल
स्मिथचा (Roger Smith) जन्म साउथ गेट, कॅलिफोर्निया येथे १८ डिसेंबर १९३२ मध्ये झाला. तो सहा वर्षांचा असतानाच त्याच्या पालकांनी त्याला स्टेज स्कूलमध्ये दाखल केले. त्यामुळे बालपणीच तो गायन, नृत्य आणि वक्तृत्वाचे धडे गिरवू लागला. हौशी गायक आणि गिटार वादक म्हणून त्यांनी अनेक कला पुरस्कार जिंकले होते.
(हेही वाचा-PoK : जम्मू-काश्मीरच्या प्रगतीमुळेच पाकव्याप्त काश्मीर भारतात येईल!)
८४ व्या वर्षी निधन
स्मिथने (Roger Smith) सुरुवातीच्या काळात नेव्हल रिझर्व्हमध्ये काम केले. जेम्स कग्नी या अभिनेत्याशी ओळख झाल्यानंतर तो हॉलिवुडकडे वळला. मॅन ऑफ अ थाउजंड फेसेसमध्ये त्याने जेम्सच्या मुलाची भूमिका साकारली होती. १९५७ मध्ये कोलंबिया पिक्चर्ससोबत करार करुन स्मिथने काही चित्रपटांत काम केले. पुढे १९५८ मध्ये वॉर्नर ब्रॉससोबत कारु लागला. Auntie Mame या चित्रपटातील त्याची भूमिका चांगलीच गाजली. The First Time आणि C.C. and Company या दोन चित्रपटांची त्याने निर्मिती केली व लेखन देखील केले. मात्र myasthenia gravis या आजारामुळे त्याने चित्रपट क्षेत्रातून माघार घेतली. वयाच्या ८४ व्या वर्षी ४ जून २०१७ मध्ये आजारामुळे त्याचे निधन झाले.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community