Ronald Ross : वैद्यकीय क्षेत्रातला नोबेल पारितोषिक मिळवणारे ब्रिटीश डॉक्टर रोनाल्ड रॉस

Ronald Ross : १९०२ साली त्यांना मलेरिया संक्रमणाच्या निवारणासाठी त्यांनी केलेल्या अथक प्रयत्नांसाठी शरीरशास्त्र या विषयात वैद्यकीय क्षेत्रातला नोबेल पारितोषिक देण्यात आले होते.

110
Ronald Ross : वैद्यकीय क्षेत्रातला नोबेल पारितोषिक मिळवणारे ब्रिटीश डॉक्टर रोनाल्ड रॉस
Ronald Ross : वैद्यकीय क्षेत्रातला नोबेल पारितोषिक मिळवणारे ब्रिटीश डॉक्टर रोनाल्ड रॉस

रोनाल्ड रॉस (Ronald Ross) हे ब्रिटीश डॉक्टर होते. १९०२ साली त्यांना मलेरिया संक्रमणाच्या निवारणासाठी त्यांनी केलेल्या अथक प्रयत्नांसाठी शरीरशास्त्र या विषयात वैद्यकीय क्षेत्रातला नोबेल पारितोषिक देण्यात आले होते. युरोपच्या बाहेर जन्मलेले ते पहिले ब्रिटिश नोबेल पारितोषिक विजेते ठरले. (Ronald Ross)

(हेही वाचा- Mihir Kote : मोदीजींचा विकास हवा की उबाठाची गुंडशाही, मिहिर कोटेचा यांचा सवाल)

रोनाल्ड रॉस (Ronald Ross) यांचा जन्म नेपाळच्या वायव्येकडील ब्रिटिश कंपनी शासित भारताच्या उत्तर-पश्चिम प्रांतातील अल्मोरा या ठिकाणी झाला. त्यांचे वडील ब्रिटिश इंडियन आर्मी मधले जनरल होते. वयाच्या आठव्या वर्षी रोनाल्ड रॉस यांना त्यांच्या मावशी आणि काकांसोबत राहण्यासाठी इंग्लंडला पाठवलं गेलं. (Ronald Ross)

त्यांनी रायड येथील प्राथमिक शाळांमध्ये शिक्षण घेतलं आणि पुढे माध्यमिक शिक्षण घेण्यासाठी त्यांना १८६९ साली साउथ हॅम्प्टनजवळच्या स्प्रिंगहिल इथल्या बोर्डिंग स्कूलमध्ये पाठवण्यात आलं. लहानपणापासूनच त्यांना कविता, संगीत, साहित्य आणि गणिताची खूप आवड होती. (Ronald Ross)

(हेही वाचा- Devendra Fadanvis : मुंबईतून मराठी माणूस हद्दपार!, फडणवीस यांनी कुणावर साधला निशाणा)

१८९७ साली शोध लावला की मलेरिया हा डासांद्वारे पसरतो. तेव्हा या रोगाशी लढण्याचा उपाय तेव्हा मिळाला. (Ronald Ross)

रोनाल्ड रॉस (Ronald Ross) हे एक बहुगुणी व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी अनेक कविता लिहिल्या होत्या. एवढंच नाही तर त्यांच्या अनेक कादंबऱ्यासुद्धा प्रकाशित झाल्या होत्या आणि त्यांनी गाणीसुद्धा लिहिली होती. ते एक हौशी कलाकार तर होतेच पण ते एक गणितज्ञ देखील होते. त्यांनी इंडियन मेडिकल सर्व्हीसमध्ये २५ वर्षं काम केलं. (Ronald Ross)

(हेही वाचा- Phase 4 Lok Sabha Election 2024: छत्रपती संभाजीनगरमध्ये २५ ठिकाणी इव्हीएममध्ये बिघाड!)

त्यांच्या सेवेदरम्यानच त्यांनी अनेक वैद्यकीय शोध लावले. भारतातील त्यांच्या सेवेचा राजीनामा दिल्यानंतर ते लिव्हरपूल स्कूल ऑफ ट्रॉपिकल मेडिसिनच्या विद्याशाखेत सामील झाले. तिथे दहा वर्षांपर्यंत संस्थेच्या ट्रॉपिकल मेडिसिनचे प्राध्यापक आणि अध्यक्ष म्हणून त्यांनी कार्य केलं. १९२६ साली ते ‘रॉस इन्स्टिट्यूट आणि हॉस्पिटल फॉर ट्रॉपिकल डिसीज’ चे डायरेक्टर-इन-चीफ बनले. हे रुग्णालय मेडिकल क्षेत्रातील त्यांनी केलेल्या महान कार्यांच्या सन्मानार्थ उभारण्यात आले होते. ते आयुष्याच्या शेवटपर्यंत तिथेच राहिले होते. (Ronald Ross)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.