दिपक दत्तात्रय माळी हा युवक ‘ रूफटॉप पारकर ॲथलीट, ॲथलेटिक्स प्रकारातील देशातील पहिला मुलगा आहे. देशातच तसेच देशाबाहेर वेगवेगळ्या रूफटॉप पारकर ॲथलीट ह्या स्तरावर त्याने काम केले आहे. गेली 17 वर्षे ॲथलेटिक्स च्या विविध प्रकारांमध्ये तो इतर मुलांना मार्गदर्शन करत आहे.
अनेक साहसी उपक्रम केलेत
मुंबई, पुणे येथे मार्गदर्शन शिबीर तसेच ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून, तो तरुण पिढीला साहसी बनवण्याचे काम करीत आहे. 32 वर्ष वयाचा हा युवक मास्टर कम्प्युटर अॅपलिकेशन, पुणे यूनिवर्सिटीमधून शिकलेला आहे. घरची परिस्थिती गरिबीची तसेच आई-वडील शेतकरी असतानासुद्धा, या युवकाने रूफटॉप पारकर ॲथलीटच्या प्रकारांमध्ये बरेच साहसी उपक्रम केले आहेत.
( हेही वाचा: पटोलेंना तातडीने बरखास्त करा, ‘या’ नेत्याने लिहिले थेट सोनिया गांधींना पत्र! )
असं केलं स्वप्न साकार
दिपकचे स्वप्न होते की, काहीतरी जागतिक स्तरावर वेगळे करून दाखवायचे, परंतु घरच्या गरीब परिस्थितीमुळे त्यावेळी ते शक्य झाले नव्हते, ते स्वप्न त्याने आज साकार केले. त्याने चाळीस मजली बिल्डिंगच्या चाळीसाव्या मजल्यावरून, क्रेनच्या साह्याने एका हाताने लटकून, एक विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे. त्याच्या या कार्याची दखल घेऊन, वर्ल्ड रेकॉर्डस् इंडियाचे विशेष प्रतिनिधी सुषमा संजय नार्वेकर व संजय विलास नार्वेकर यांनी त्याला प्रमाणपत्र सर्टिफिकेट व मेडल देऊन, त्याचा सत्कार केला आणि त्याच्या पुढील वाटचालीसाठी दिपकला शुभेच्छा दिल्या. दिपकने त्याच्या यशाचे श्रेय त्याचे आई-वडील आणि वर्ल्ड रेकॉर्डस् इंडियाचे सीनियर एज्युकेटर संजय सर आणि सुषमा मिस यांना दिले आहे.
Join Our WhatsApp Community