-
ऋजुता लुकतुके
रॉयल एनफिल्ड कंपनी यंदा दिवाळीत आपल्या दोन नवीन बाईक बाजारात आणण्याची तयारी करत आहे. यातली एक आहे आतापर्यंतची कंपनीची सगळ्यात महाग बाईक. असं आहे काय यात? दिवाळीचा हंगाम नवीन खरेदीचा असतो. त्यामुळे कंपन्याही आपली नवीन उत्पादनं याच कालावधीत लाँच करतात. रॉयल एनफिल्ड या हाय-एंड बाईक बनवणाऱ्या कंपनीने आपल्या दोन नवीन बाईक यंदा दिवाळीत बाजारात आणण्याचं ठरवलंय. यातली एक आहे ॲडव्हेंचर बाईक आरएन हिमालयन तर दुसरी आहे शॉटगन ६५०. (Royal Enfield Shotgun 650)
यापैकी शॉटगन ६५० ही बाईक कंपनीची आतापर्यंतची सगळ्यात महागडी बाईक असणार आहे आणि नोव्हेंबरमध्ये ती भारतात लाँच होईल अशी शक्यता आहे. ऑटोमेटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया या संस्थेकडून पर्यावरणविषयक आवश्यक प्रमाणपत्र कंपनीला मिळालं आहे. त्यामुळे आता लाँच नक्की आहे. ही बाईक रॉयल एनफिल्डच्या इतर ६५० सीसी इंजिन असलेल्या बाईकसारखीच असणार आहे. या इंजिनातून ४७ बीएचपी इतकी शक्ती निर्माण होऊ शकेल. मग या गाडीची किंमत सगळ्यात जास्त का आहे? (Royal Enfield Shotgun 650)
(हेही वाचा – Pravin Darekar : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व महायुती सरकारच आरक्षण देतील; प्रविण दरेकरांचा दावा)
शॉटगन ६५० ची वैशिष्ट्यं
इतर ६५० सीसी इंजिनच्या बाईकपेक्षा या बाईकचा चेहरामोहरा जास्त आटोपशीर आहे. ही बाईक शहरातील रस्त्यांवर चालवण्यायोग्य बनवण्यात आल्याचा कंपन्यांचा दावा आहे आणि त्यासाठी तिचा लूकही स्ट्रीट लूक असल्याचं कंपनीचं म्हणणं आहे. (Royal Enfield Shotgun 650)
Royal Enfield Shotgun 650 Rendered Ahead Of Launch https://t.co/dMRQPmol2p pic.twitter.com/5u1eJYvY2z
— RushLane (@rushlane) September 9, 2023
या बाईकची जाडी आणि लांबीही आधीच्या बाईकच्या तुलनेत कमी आहे. ग्राऊंड क्लिअरन्स मात्र जास्त आहे. शॉटगनची सर्व माहिती अजून कंपनीने उघड केलेली नाही. पण, ती रोजच्या वापरासाठी असलेली बाईक आहे एवढं नक्की. त्यामुळे गाडीला अलॉय व्हील्स आणि अँटी लॉक ब्रेकिंग डुआल यंत्रणाही आहे. सगळ्यात आधी ७ नोव्हेंबरला ही गाडी इटलीत मिलान इथं लाँच होत आहे आणि त्यानंतर महिन्याच्या शेवटी ती भारतात लाँच होण्याची शक्यता आहे आणि किमतीबद्दल बोलायचं झालं तर ती आहे ३.७ ते ३.९ लाख रुपयांच्या दरम्यान. (Royal Enfield Shotgun 650)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community