मुंबई म्हटलं की घड्याळ्याच्या काट्यावर धावणारी मुंबई डोळ्यासमोर येते आणि मुंबई म्हटलं की येते ती मुंबईची लाईफलाईन. अनेकदा घाईगडबडीत मुंबई लोकल पकडताना अनेक घटना अशा घडल्या आहेत ज्या लक्ष वेधून घेतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडिओेने नेटकऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकावला आहे.
(हेही वाचा – Mhada Lottery 2022: म्हाडाच्या सोडत रकमेत वाढ? आता किती असणार डिपॉझिट?)
मिळालेल्या माहितीनुसार, लोकलमध्ये असणाऱ्या लोकांनी धक्काबुक्की केल्याने एका महिलेचा तोल गेला आणि तिच्यासह दोन मुलं देखील प्लॅटफॉर्मवर पडली. आरपीएफ जवानाने प्रसंगावधान दाखवत उडी मारत या महिलेला आणि तिच्या दोन मुलांना ट्रेनखाली येण्यापासून सुखरूप वाचवले.
काय घडला प्रकार
मिळालेल्या माहितीनुसार, मानखुर्द रेल्वे स्थानकावर एक थरारक प्रसंग घडला. रोजच्या दिवसाप्रमाणे मानखुर्द रेल्वेस्थानकावर प्रवाशांची गर्दी होती. या स्थानकावर चालत्या लोकल ट्रेनमधून एक महिला तिच्या दोन मुलांसह पजली. मात्र चालत्या ट्रेनमधून पडलेल्या महिला आणि तिच्या मुलाचे प्राण आरपीएफच्या गुन्हे शाखेच्या दोन जवानांनी वाचवले. आरपीएफच्या दोन जवानाने दाखवलेल्या प्रसंगावधान दाखवल्याने ट्रेनमधून पडलेल्या महिला आणि तिच्या दोन मुलांचे प्राण वाचले आहेत. या आरपीएफच्या जवानाचे सगळीकडे कौतूक होत आहे. या जवानांनी मृत्युच्या दाढेतून आई आणि तिच्या दोन मुलांना वाचवले आहे.
बघा व्हिडिओ
Join Our WhatsApp CommunityRPF च्या जवानाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मृत्युच्या दाढेतून आई आणि तिची दोन मुलं बचावले#RPF @RPFCR @Central_Railway pic.twitter.com/5zS3RbgeI7
— Hindusthan Post Marathi (@HindusthanPostM) November 2, 2022