RRB-NTPC Result: विद्यार्थ्यांना मारहाण केल्याप्रकरणी 6 पोलीस निलंबित, तर…

75

बिहारमध्ये, RRB आणि NTPC परीक्षेच्या निकालातील गैरप्रकारामुळे संतप्त विद्यार्थी गेल्या दोन दिवसांपासून रेल्वे स्थानकांवर सतत गोंधळ घालत आहेत. अनेक ठिकाणी रेल्वे मालमत्तेचेही नुकसान झाले असून याबाबत विद्यार्थ्यांनी रेल्वे स्थानकांवर हिंसाचार आणि जाळपोळ करताना पकडले तर त्याला आयुष्यभर रेल्वेत नोकरी मिळणार नाही, असा इशारा रेल्वेकडून देण्यात आला आहे. रेल्वे विभागातील RRB आणि NTPC, CBT परीक्षा एकच्या निकालामध्ये गैरप्रकार झाल्याचा आरोप बिहारमधील विद्यार्थ्यांनी केला आहे. यावेळी पोलिसांनी देखील फायरींग आणि लाठीचार्ज केला असल्याची माहिती मिळतेय. प्रयागराजमध्ये रेल्वे परीक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांना मारहाण केल्याप्रकरणी सहा पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे.

असा आहे पोलिसांवर आरोप

दरम्यान, या घटनेमागे राजकीय षडयंत्र असल्याची भीती एसएसपींनी व्यक्त केली आहे. दुसरीकडे, परीक्षेसंदर्भात बिहारमध्ये काल सलग दुसऱ्या दिवशी रेल्वे जाळण्यात आली. त्याचवेळी पोलिसांनी खान सरांसह पटनामधील अनेक कोचिंग सेंटर्सवर विद्यार्थ्यांना भडकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. निलंबित करण्यात आलेल्या सहा पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये एक निरीक्षक, दोन उपनिरीक्षक आणि तीन हवालदारांचा समावेश आहे. या सर्वांवर अनावश्यक बळाचा वापर केल्याचा आरोप आहे. 24 जानेवारी रोजी, रेल्वेच्या एनटीपीसी परीक्षेच्या निकालासंदर्भात पटनामध्ये विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ प्रयागराजचे विद्यार्थीही रस्त्यावर उतरले होते.

(हेही वाचा – RRB-NTPC निकालाविरोधात विद्यार्थी संतप्त अन् पेटवलं थेट रेल्वेचं इंजिन!)

बिहारमध्ये सलग तिसऱ्या दिवशी विद्यार्थ्यी आक्रमक

प्रयागराजचे एसएसपी अजय कुमार यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांच्या निषेधाबाबत कर्नलगंज पोलिस ठाण्यात एफआयआरही नोंदवण्यात आला असून, त्यात तीन जणांना मुख्य आरोपी बनवण्यात आले आहे. यातील दोघांना अटक करण्यात आली आहे, तर एकजण फरार आहे. बिहारमध्ये बुधवारी सलग तिसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांनी रेल्वे गाड्यांना लक्ष्य केले. गयामध्ये विद्यार्थ्यांनी ट्रेनचे अनेक डबे जाळले. आग एवढी भीषण होती की, अनेक तास या आगीच्या ज्वाळा अशाच भडकत राहिल्याने येथे रॅगिंग करणाऱ्या विद्यार्थ्यांना आटोक्यात आणण्यासाठी सुरक्षा दलालाही पूर्ण ताकद लावावी लागली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.