कर्नाटकातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. चक्क एका रेल्वे कर्मचा-याने जुगारात कर्जबाजारी झाल्याने शासनाच्या पैशांवर डल्ला मारला. इतकच नाही तर आपली चोरी लपवण्यासाठी त्याने पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी दरोडा पडल्याचा बनाव आखला.
असा रचला बनाव
कर्नाटकातील तिरुवांम्यूर येथील एमआरटीएस तिकीट काऊंटरवर प्रवाशांना तिकीट देण्याचं काम टीकाराम नावाचा कर्मचारी करत होता. तिरुवांम्यूर एमआरटीएस तिकीट काऊंटर साधारण पहाटे 4 वाजता किंवा त्यापूर्वी उघडण्यात येतं. ज्या दिवशी ही घटना घडली त्यावेळी तिकीट काउंटर न उघडल्यामुळे प्रवाशांची गर्दी झाली होती. त्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यामुळे पोलिसांनी त्या ठिकाणी धाव घेतली. तिकीट काउंटर उघडले नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी आत जाऊन पाहिले तर तिकीट विक्री कर्मचारी टीकारामचे हातपाय दोरीनं बांधून त्याच्या तोंडात कापडाचा बोळा कोंबून त्याला खिडकीला बांधून ठेवल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी त्याची सुटका केली. त्याच्याकडे चौकशी केली असता, त्याने पावणे चारच्या सुमारास काउंटर उघडण्यासाठी आत येताच आपल्या मागून 3 दरोडेखोर आले आणि बंदुकीचा धाक दाखवून काउंटरची 1 लाख 32 हजारांची रोकड घेऊन पळाले, असे टीकारामने पोलिसांनी सांगितले.
( हेही वाचा :राज्यात ‘असे’ होतेय शिक्षणाचे इस्लामीकरण! )
पोलिसांनी असा लावला छडा
घटनेचे गांभीर्य लक्षात घेता, पोलिसांना तात्काळ तपासाची चक्रे फिरवली. जेथे घटना घडली तेथे सीसीटीव्ही नव्हते, त्यामुळे पोलिसांना स्निफर डाॅगची मदत घ्यावी लागली. पोलिसांनी परिसरातील अन्य काही सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. मात्र, त्यातूनही काही माहिती हाती लागली नाही. त्यामुळे पोलिसांनी टीकारामकडे अधिक चौकशी करण्यास सुरुवात केली. त्याच्या पत्नीला चौकशीसाठी ताब्यात घेतलं. पत्नीची चौकशी करत असताना, तिने गुन्ह्याची कबुली दिली. आपणच आपल्या पतीला बांधून आणि पैसे घेऊन गेल्याची कबूली दिली. दोघांनाही पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्याकडून चोरलेले 1 लाख 32 हजार रुपयेदेखील जप्त करण्यात आले आहेत.
Join Our WhatsApp Community