ई-चलन न भरणाऱ्या ३६ लाख वाहन चालकांना अल्टिमेटम, अन्यथा…

149

महाराष्ट्रातील वाहतूकीचे नियम मोडल्यावर वाहनचालकांना वाहतूक पोलिसांमार्फत आकारल्या  गेलेल्या ई-चलनाची रक्कम वाहनचालकांकडून भरली न गेल्याचं उघडं झालं आहे. महाराष्ट्रातील एकूण 36 लाख वाहनचालकांनी स्थानिक वाहतूक पोलिसांमार्फत जारी केलेल्या प्रलंबित 1 लाख 45 हजार कोटी ई-चलनाचा दंड भरलेला नाही. त्यामुळे आता कडक कारवाई करत ई-चलन न भरणा-यांना 11 डिसेंबरला लोक अदालतमध्ये उपस्थित राहण्यासाठी नोटीस बजावण्यात आली आहे. जानेवारी 2019 पासून न भरले गेलेले  ई-चलन दंड 1,191.76 कोटी रुपये आहेत.

वाहनचालकांना पाठवल्या नोटिसा 

वाहतूकीचे नियम धाब्यावर बसवणा-या वाहनचालकांनी त्यांचे ई-चलन मोठ्या प्रमाणात न भरल्याने, महाराष्ट्र महामार्ग सुरक्षा पेट्रोलिंग विभागाने ही प्रकरणे लोक अदालतीसमोर मांडण्यासाठी महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण आणि मुंबई उच्च न्यायालयात संपर्क साधला होता. या वर्षी सप्टेंबरपासून, वाहतूक पोलिसांनी 10 लाख वाहनचालकांना प्री-लिटिगेशन नोटीस बजावण्यास सुरुवात केली.

तर न्यायालयात खटला उभा राहणार

नोटिस बजावण्याची दुसरी फेरी 19 नोव्हेंबरपासून सुरू झाली आणि आतापर्यंत 36 लाख वाहनधारकांना नोटिस बजावण्यात आल्या आहेत. लोक अदालतीला हजर राहावे लागेल या भीतीने हजारो वाहनधारकांनी ३४.८१ कोटी रुपयांचा दंड भरला असून, उर्वरितांना शनिवारी न्यायालयात हजर राहावे लागणार आहे.

 ( हेही वाचा: राहुल गांधींच्या सभेला महाविकास आघाडी परवानगी नाकारणार? )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.