Mohan Bhagwat : जगाला शोकांतिकेतून दिलासा देणारा नवा भारत उभा राहील, राम मंदिर त्याचे प्रतीक – मोहन भागवत

या युगात रामलल्लाच्या परत येण्याचा इतिहास जो श्रवण करेल, त्याच्या सर्व वेदना, दु:ख नष्ट होईल. या इतिहासात इतकं सामर्थ्य आहे.

204
Mohan Bhagwat : जगाला शोकांतिकेतून दिलासा देणारा नवा भारत उभा राहील, राम मंदिर त्याचे प्रतीक - मोहन भागवत
Mohan Bhagwat : जगाला शोकांतिकेतून दिलासा देणारा नवा भारत उभा राहील, राम मंदिर त्याचे प्रतीक - मोहन भागवत

‘जगाला शोकांतिकेतून दिलासा देणारा नवा भारत उभा राहील, मंदिर हे त्याचे प्रतीक आहे’, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठापनेच्या दिवशी म्हणाले.

अयोध्येतील राम मंदिरात भव्यदिव्य सोहळ्यानंतर श्री रामलल्लाचा अभिषेक विधी संपन्न झाला. धार्मिक विधी पूर्ण झाल्यानंतर मंदिर परिसरात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना ते म्हणाले की, ‘या युगात रामलल्लाच्या परत येण्याचा इतिहास जो श्रवण करेल, त्याच्या सर्व वेदना, दु:ख नष्ट होईल. या इतिहासात इतकं सामर्थ्य आहे.’

(हेही वाचा – Shri Ramlala pratishthapana :  श्रीरामलला मूर्ती प्राणप्रतिष्ठाच्या कार्यक्रमाचे मनमोहक क्षणचित्रे )

यावेळी उपस्थितांना संबोधित करताना मोहन भागवत म्हणाले, ‘आज ५०० वर्षांनंतर रामलल्ला परतले आहेत आणि ज्यांच्या प्रयत्नांमुळे प्राणप्रतिष्ठेचा सुवर्ण दिवस आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यांना कोटी कोटी प्रणाम करून आम्ही भावपूर्ण आदरांजली वाहात आहोत.

स्मरण करण्याचा आजचा दिवस
सर्वांनी मिळून काम करून आपल्या देशाला विश्वगुरु बनवूया, असे भागवत म्हणाले. पाचशे वर्षांच्या संघर्षानंतर हा क्षण आपल्याला बघण्याचे भाग्य आज मिळाले आहे. आजचा दिवस बघता यावा याकरिता ज्यांनी ज्यांनी संघर्ष केला आहे, त्यांची आठवण काढण्याचे, त्यांचे स्मरण करण्याचा आजचा दिवस आहे. त्यांनी स्वीकारलेले राष्ट्रसेवेचे हे व्रत आपल्याला पुढे न्यायचे आहे. धर्मस्थापनेसाठी प्रभु श्री रामचंद्र आले आहेत. त्यांच्या संदेशाचे आपल्याला पालन करायचे आहे,असेही मोहन भागवत म्हणाले.

आपल्यालाही तप करायला हवे… 
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ११ दिवसांच्या अनुष्ठानाबाबत मोहन भागवत म्हणाले की, ‘या समारंभासाठी पंतप्रधानांनी कडक उपवास केल्याचे मला कळले. माझी त्याच्याशी जुनी ओळख असून ते एक तपस्वी आहेत तसेच अयोध्येत कोणताही संघर्ष अथवा वाद नाही. श्रीराम १४ वर्षांनंतर अयोध्येत आले आणि इथला कलह नष्ट झाला. रामलल्ला या युगात आज पुन्हा अवतरले आहेत. त्यांच्या इतिहास जो श्रवण करेल, त्याचे दु:ख दूर होईल. पंतप्रधान मोदींनी जसे तप केले तसेच तप आपल्यालाही करावे लागेल. ‘, असेही ते म्हणाले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.